पुसद येथील पल्लव शिरमवार ठरला ‘ऑल इंडिया अबॅकस’ विजेता

पुसद : नुकत्याच हैदराबाद येथे झालेल्या ऑल इंडिया नॅशनल लेवल अबॅकस च्या पाचव्या लेवल मध्ये सुप्रसिद्ध तिरुपती डेव्हलपर बसचे संचालक आनंद शिरमवार यांचे चिरंजीव पल्लव शिरमवार यांनी भारतातून चॅम्पियन विजेता ठरला आहे. त्यानी हैदराबाद येथे झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस च्या परीक्षेमध्ये भाग घेऊन भारतातून पाचव्या लेवल मध्ये चॅम्पियन विजेता ठरला आहे.
पुसद शहराचे नाव नॅशनल लेवलला नेऊन त्यांनी हा बहुमान मिळवला आहे त्यामुळे पुसद शहरात प्रतिष्ठितांच्या वतीने त्यामध्ये डॉ.सतीश चिद्दरवार मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पुसदचे मॅनेजिंग डायरेक्टर, बंजारा काशी श्रीक्षेत्र पोहरादेवी सर्व महाराज पंडित गण व नारायण भाऊ चव्हाण बंजारा काशी पोहरा देवी डेव्हलपर्स पुसद, तिरुपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे राजेश पिवळटकर, आशिष शिरमवार, मधुकर राठोड तिरुपती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पुसद, अनिल श्रीरंग चव्हाण (पाटील) शिवसेना शहर संघटक पुसद,आशिष सावंगेकर तलाठी, विजय तूनगर साहेबराव पवार, मेडिकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चे पुसद चे सर्व कर्मचारी, श्रीकांत भागवत, श्रीकांत बेलोरकर, सुरज बीजमवार व दस्तलेखक मुद्रांक व विक्रेता संघटना पुसद यांचेकडून चिरंजीव पल्लव शिरमवार वर अभिनंदनचा वर्षाव होत असून त्याचेेेे कौतुक केले जात आहे.