प्रा.डॉ.अनुश्री पुरी (बन) यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र् प्रेरणा पुरस्कार-२०२५ पुरस्काराने सन्मानित

पुसद:युवा महाराष्ट्र फाऊंडेशन,पुणे यांच्या वतीने दि.२६ जानेवारी २०२५ च्या प्रजासत्तकदिनानिमित्त विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगीरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी दि.३० जानेवारी २०२५ रोजी महानगरपालिका बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे.राज्यस्तरीय महाराष्ट्र प्रेरणा-२०२५ पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रा.डॉ.अनुश्री पुरी (बन) फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथील पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात कार्यरत तथा श्रीमंती वत्सलाबाई नाईक महीला महाविद्यालयच्या समाजशास्त्र विभागात प्र. विभाग प्रमुख म्हणून कार्यरत अलेल्या व तालुका महिला अध्यक्ष.लघु उद्योग भारती एमआयडीसी पुसद यांच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय केलेल्या कर्याची दखल घेऊन कर्तुत्ववान महीला म्हणून त्यांची महाराष्ट्र राज्य पुरस्कार -२०२५ च्या पुरस्कारासाठी निवड होऊन त्यांना मा.हसिनी सुधीर साऊथ अभिनेत्री,मा विजय चौधरी, उपविभागीय पोलिस अधिकारी,कुस्तीमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी,विश्व विजेता वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्वर्ण पदक विजेते पुणे,मा.डॉ.आदित्य पतकराव,अध्यक्ष मा.डॉ.आदित्य पतकराव,युथ फाऊंडेशन तथा परिवर्तन व विकास बहुउद्देशीय शिक्षणं संस्था सांगली मां.डॉ.अविनाश सकुंडे अध्यक्ष आंतरराष्ट्रीय मानव अधिकार राजदूत संघटना,तथा अध्यक्ष, इंटरनॅशनल इकॉनॉमिक फेडरेशन पुणे,मा.श्री.भानुदास बर्गे पोलिस अधिकारी (ATS) यांच्या उपस्थितीत व हा पुरस्कार मा.डॉ.आदित्य पतकराव अध्यक्ष, युथ फाऊंडेशन तथा परिवर्तन व विकास बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांच्या हस्ते सन्मानपत्र,स्मृतिचिन्ह,स्वर्ण पदक देऊन हा हह्या महाराष्ट्र प्रेरणा पुरस्कार २०२५ च्या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना हे पुरस्कार मिळाल्याबद्दल जनता शिक्षणं प्रसारक मंडळाचे अध्यक्ष,श्री.जयभाऊ नाईक,सचिव, श्री.मनोहर भाऊ नाईक, तसेच प्राचार्य मा.श्री.श्री.डॉ.प्रल्हाद वावरे फु. ना. महा.वि.प्राचार्य.मा.डॉ. छाया कोकाटे श्रीमती.व.ना.म ,महा वि.पुसद,श्री.उमेश चव्हान प्र.प्रबंधक.प्रा.डॉ.वसंत कांबळे पदवी व पदव्युत्तर समाजशास्त्र विभाग प्रमुख व दोन्ही महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी महाविद्यालयातील पदवी- पदव्युत्तर विद्यार्थ्यांना या पुरस्कारा पासून प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त करत अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.