जागतीक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने पुस्तक प्रदर्शन व निबंध स्पर्धेचे आयोजन

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिवस हा जागतिक मराठी भाषा म्हणून देशभर साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधुनवणी मध्ये ग्रंथ प्रदशनी व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन दि. १ ऑगस्ट रोजी मंगळवार ला सकाळी ९ वा. डी. एस. बुक सेंटर, विराणी टॉकीज रोड वणी. या ठिकाणी होणार आहे. हे ग्रंथ प्रदर्शन ६ तारखे पर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील. तसेच “मराठी साहित्याचा मानबिंदू- अण्णाभाऊ साठे” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंधाची शब्दमर्यादा ३०० शब्द आहे.
अटी व नियम
1)निबंध सुवाच्य अक्षरात लिहावा.2) व्याकरणाच्या चुका टाळाव्यात.3)दिलेल्या शब्दमर्यादेचे पालन करावे.4)निबंध स्पर्धेत सर्व वयोगटातील व्यक्ती सहभागी होऊ शकतात. 5)उत्कृष्ट निबंध निवडून त्यांना प्रथम,द्वितीय,तृतीय आणि दोन प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात येतील.6)निबंध लिहिताना दिलेल्या विषयाचे शीर्षक सर्वात वर लिहावे. त्यानंतर विषयाची अभ्यासपूर्ण मांडणी करावी. शेवटी स्वतःची स्वाक्षरी करून त्याखाली आपले पूर्ण नाव, दिनांक व मोबाईल क्रमांक लिहावा. 7)आपल्या निबंधाचे pdf दि. 02ऑगस्ट पर्यंतच पाठवावे. त्यानंतर आलेले निबंध विचारात घेतले जाणार नाहीत. 8)निबंध हे pdf स्वरूपात पुढील मोबाईल क्र.वर पाठवावे. 1)मारोती जिवतोडे- 9405411040 2)नितीन मोवाडे – 8788384305,3)मंगेश खामनकर – 7972 296167,4)दत्ता डोहे – 9689 940507आयोजीत दोनही उपक्रमाचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजकांकडून करण्यात येत आहे.