जेट किड्स इंटरनॅशनल स्कुलच्या गार्गी बोजेवारचे नवोदय परीक्षेत यश

पुुुसद :केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दिल्ली अर्थात सीबीएससी बोर्डव्दारे घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेत पुसद येथील एकमेव सीबीएससी अभ्यासक्रम राबविणार्या जेट किड्स इंटरनॅशनल स्कुल मधील कु. गार्गी अमित बोजेवारने घवघवीत यश संपादन केल्याने तिची जवाहर नवोदय विद्यालयातील.इ.६ वीतील प्रवेशासाठी निवड झाली आहे.विशेष म्हणजे ग्रामीण भागातून ती जिल्ह्यातून व्दितीय आली आहे. गार्गीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व गुरुजनांना दिले आहे. तिला विशेष मार्गदर्शन स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शक संतोष वाडीकर, अश्विनी वाडीकर यांचे लाभले.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमोल मालपाणी,सचिव डॉ.अस्मिता मालपाणी ,संचालक शाळा समिती कौस्तुभ धुमाळे,तुषार सेता,मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंदानी तिचे कौतुक करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ती पुसद पंचायत समितीतील शिक्षण विस्तार अधिकारी अमित बोजेवार व जि.प.शिक्षिका ज्योती बोजेवार यांची कन्या आहे.



