मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पुसद तालुक्यातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा!

पुसद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता पुन्हा एकदा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे आज २९ ऑगस्ट२०२५ पासून मुंबई येथील आझाद मैदानात उपोषणास बसले आहेत.त्यांच्या उपोषणाला पुसद तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवच्यावतीने पाठिंबा दर्शविला असून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागण्या तात्काळ मान्य करून या अमरण उपोषणाला वेळ वाढवून देण्यात या मागणीचे निवेदन पुसद येथील सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आजपासून मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाच्या समर्थात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने सकल मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहे.सरकार आमच्या सर्व मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, यावेळी मनोज जरांगे यांनी गोळ्या घातल्या तरी मुंबईतून जाणार नाही, असं म्हटलं आहे. वेळप्रसंगी गोळ्या खाव्या लागल्या तरी आता मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे. या आंदोलनाला शरद पवार आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने देखील आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.जरांगे पाटलांनी पोलिसांकडे आंदोलनासाठी आणखी वेळ वाढवून देण्याची परवानगी मागितली आहे. हे उपोषण कायद्याच्या चौकटीत राहून केले जाणार असल्याचेही सांगितले आहे.त्यामुळे राज्य सरकारने सहकार्याची भूमिका घेवून जरांगे पाटलांच्या उपोषणाला वेळ वाढवून द्यावा व सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणी तात्काळ करावी या संदर्भात पुसद तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. जर सरकारने ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुसद तालुक्यातील सकल मराठा समाज आपल्या मुलाबाळासह उपोषणास बसणार असल्याचा इशाराही दिला आहे.यावेळी या निवेदनावर विलासराव वानखेडे, संतोषराव सूर्यवंशी, देवानंद चव्हाण, ॲड.गजानन देशमुख, बाळासाहेब देशमुख, संग्राम देशमुख, अभिजीत पानपट्टे, अमोल साखरे, सुशांत महल्ले, प्रदीप देशमुख, भुजंगराव देशमुख, अदी सकल मराठा समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी स्वाक्षरी आहेत.