ईतर

एच.ई.एस विद्यालयाचे मुख्याध्यापक मुकुंद पांडे यांचा विविध संघटनेतर्फे सेवापूर्ती सत्कार सोहळा संपन्न !

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील हिवरा शिक्षण संस्था हिवरा द्वारा संचलित एच. ई.एस विद्यालय व माध्यमिक विद्यालयाचे शिस्तप्रिय व लोकप्रिय मुख्याध्यापक श्री.मुकुंद सुभाषराव पांडे हे नियत वयोमानानुसार ३० जून २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले त्यांना तब्बल ३० वर्ष ७ महिन्याचा सेवाकाळ लाभला त्यानिमित्त आज हिवरा संगम येथील एकवीरा देवी संस्थानच्या सभागृहात त्यांच्या सत्काराचे आयोजन

त्यांच्या मित्र मंडळासह विविध संघटनेतर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अनंदराव कदम विश्वस्त एकवीरा देवी संस्थान, प्रमुख पाहुणे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, दादाराव कदम सर, एस .के .कदम, सौ.स्मिताताई साहेबराव कदम संचालिका यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक यवतमाळ, हे उपस्थित होते याप्रसंगी सेवानिवृत्त मुख्याध्यापक मुकुंद पांडे यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी एकवीरा देवी संस्थान, मोक्षधाम सेवा समिती, सरस्वती वाचनालय, ईश्वर महादेव संस्थान, शिवशक्ती स्पोर्टिंग क्लब, १९९८ व १९९९ दहावी बॅच ग्रुप ,सह मित्र मंडळ तर्फे मुकुंद पांडे सर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला मुकुंद पांडे यांच्या शैक्षणिक सामाजिक धार्मिक कार्याचा गौरव करून त्यांचा भावी वाटचालीच्या शुभेच्छा माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील, पत्रकार संघ,एस.के. कदम, दादाराव कदम सर यांच्याकडून मनोगतातून देण्यात आल्या सत्काराला उत्तर देताना मुकुंद पांडे यांनी गावकऱ्यासह मित्रमंडळीचे ऋण न फिटणारे आहेत मित्र मंडळीसह गावकऱ्यांनी दिलेले प्रेम आपण कधीही विसरू शकणार नाही असे उद्गार काढले या कार्यक्रमाचे संचलन डॉ.धोंडेराव बोरुळकर तर आभार अभय बोंपीलवार यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close