पुसद येथे दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या कारवाई संदर्भातील वृत्ता बाबतच पत्रकार परिषदेत आयोजकांनी अक्षेप घेतल्याने पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची पत्रकार परिषद बारगळली!

पुसद : शहरातील वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मागील सात दिवसापूर्वी पार्वती नगर परिसरात दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २० विशेष पथकांनी मध्यरात्रीच्या सुमारास शहरात एन्ट्री करुन विशिष्ट गुप्त माहितीवरून शहरातील संशय असलेल्या जवळपास १३ ठिकाणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शोध मोहिम राबवित मोठी कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली होती.या शोध मोहीमेत संशयताकडून काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे ( लॅपटॉप, मोबाईल)आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची सूत्राची माहिती होती मात्र प्रत्यक्षात कोणत्याही व्यक्तीला अटक झाली नाही परंतु हे प्रकरण चौकशीत आहे.मात्र या शोध मोहीम कारवाई संदर्भात काल मुस्लिम कुल जमात संघटनेचे समन्वयक नासेर खतीब नांदेड यांनी या कारवाईवर आणि वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी परसारीत केलेल्या वृत्ताबाबत थेट पत्रकारावर व वृत्तवाहिन्यावर आक्षेप नोंदविला असून वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्र ही आमच्या समाजाची बदनामी जाणीवपूर्वक करीत असून या कारवाईमुळे आणि प्रकाशित झालेल्या बातम्यामुळे प्रभावित कुटुंब भयभीत झाले आहेत असा आक्षेप नोंदविल्याने पत्रकार परिषदेत पत्रकारांमध्ये व आयोजकामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली आणि एकच गोंधळ उडाला त्यामुळे ही पत्रकार संपूर्ण बारगळली आहे.
पुसद शहरात वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परीसरात सात दिवसापूर्वी म्हणजे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वाखाली २० विषेश पथकाने मध्यरात्री शोध मोहीम राबवून छापा कारवाई केली होती. त्यामुळे शहरासह परिसरात एकच खळबळ उडाली होती.या दहशतवाद विरोधी पथकाने ( एटीएस) केलेल्या शोध मोहिमे अंतर्गत छापा कारवाई संदर्भात काल दि.२१ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २:३० वाजण्याच्या सुमारास शासकीय विश्राम गृह पुसद येथे प्रभावित कुटुंबांची भूमिका व वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडण्यासाठी मुस्लिम कुल जमात संघटनेचे समन्वयक नासेर खतीब (नांदेड) यांच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस)शोध मोहीम राबविल्याने या प्रकरणात आमच्या समाजातील अनेक प्रभावित कुटुंबांमध्ये भीतीचे व मानसिक तणावाचे वातावरण निर्माण झाले असून काही घरांमध्ये आरोग्यविषयक,अडचणी तसेच शाळा विद्यालयाच्या परीक्षा उंबरठ्यावर असलेले विद्यार्थी आहेत. यापार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबांचे खचिकरण झाल्याचे सांगुन विविध वृत्तपत्राचे व प्रिंटमियाचे तसेच वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना अंमत्रीत करून आपली बाजू अधिकृतपणे मांडणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, युट्युब चॅनल वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधि तत्परतेने विश्राम गृहावर पोहोचले. मात्र यावेळी पत्रकार परिषद सुरु होताच सुरवातीलाच आयोजकांनी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) च्या चौकशी पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. आणि एकीकडे या कारवाईचे समर्थनही केले असून ही कारवाई सर्च वॉरंट शोध मोहिमेअंतर्गत झाल्याचे सांगितले आणि दोषी असतील तर कारवाई झालीच पाहिजे असेही सांगितले. मात्र या शोध मोहीमेत इलेक्ट्रॉनिक उपकरणे ( लॅपटॉप, मोबाईल)आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त करण्यात आले.पण प्रत्यक्षात कोणत्याही व्यक्तीला अटक झाली नसल्याच्या सांगितले परंतु हे प्रकरण चौकशीत असल्याचे सांगितले आणि चौकशीतून जे निष्पन्न होईल तेव्हा तशा पत्रकारांनी बातम्या लावल्या पाहिजे असेही सांगितल.परंतु ही कारवाई करताना दहशतवाद विरोधी पथकाने योग्यरीत्या कारवाई केली नाही असाही दहशतवाद विरोधी पथकाच्या कारवाईबाबत आक्षेप घेतला त्या नंतर आयोजकांनी दिलेल्या प्रेस नोट मध्ये प्रसार माध्यमाच्या व प्रिंट मीडिया तसेच वृत्तवाहिनीच्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या संदर्भात आक्षेप घेण्यात आला आणि कोणत्याही व्यक्ती ला दोषी ठरविणारे वार्ताकन टाळा,अप्रामाणित एकतर्फी माहिती ची पडताळणी करा आदी सल्ला प्रसिद्धी पत्रकामधून दिला गेला. त्यामुळे या पत्रकार परिषदेला उपस्थित सर्वच माध्यमाच्या प्रतिनिधिंनी तुम्ही पत्रकारांना बातम्या कशा प्रकाशित कराव्या याबाबत दबाव टाकता आहात कां? असे अनेक आक्षेप घेत प्रकरणाशी निगडित अनेक प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी पत्रकारांनीही आयोजकांना विचारले की तुम्ही तुमच्या पत्रकार परिषदे या कारवाईत प्रभावित कुटुंबातील एकही व्यक्ती नाही कां? किंवा त्यांना हजार कां? केले नाही? प्रभावित कुटुंबाला काय त्रास झाला याचे तुमच्याकडे उत्तर नाही व हे तुम्हाला मांडता किंवा सांगता येत नाहीआपण फक्त वृत्तवाहिन्यां बद्दल आणि वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या बाबत घेतलेले आक्षेप हे चुकीचे आहेत असे प्रश्न विचारले त्यावेळी या पत्रकार परिषदेमध्ये आयोजकामध्ये व पत्रकारांमध्ये शाब्दिक बचाबाची झाली. आणि एकच गोंधळ उडाल्याने आयोजक निरुत्तर झाले आणि आयोजकांना ही पत्रकार परिषद तात्काळ गुंडाळावी लागली. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदमध्ये आयोजकांनी या कारवाईमुळे प्रभावित झालेल्या कुटुंबातील एकही सदस्यांना उपस्थित केले नव्हते त्यामुळे ही पत्रकार परिषद कोणत्या हेतूने आयोजित केली हे प्रश्न मात्र अनुत्तीत राहिला आहे. त्यामुळे ही संपूर्ण पत्रकार परिषद बारगळली.या पत्रकार परिषदेला सैयद इशत्याक, इम्तियाज भाई (गुड्ड भैय्या) सैयद सिद्दीकोद्धीन, अमजद खान, माजी नगरसेवक सैयद जहिर, फिरोज खान आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.



