शैक्षणिक

माउंट लिट्रा झी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम!

पुसद: येथील माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकणारा विद्यार्थी हर्षद सुधीर राठोड, व प्राची गजानन खंडेलवाल या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून माऊंट लिट्रा झी स्कूलची यशाची परंपरा कायम राखली.सदर स्पर्धा क्रीडा व युवक कल्याण सेवा संचालनालय पुणे ,महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यवतमाळ आणि जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. हर्षद राठोड व प्राची खंडेलवाल या विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थाध्यक्ष विक्रम गट्टाणी, उपाध्यक्ष अमर आसेगावकर,सचिव संदीप जिल्हेवार,कोषाध्यक्ष रवी गट्टाणी, संचालक भागवतजी चिद्दरवार व सर्व संचालक मंडळांनी सदर विद्यार्थ्यांचे व कुस्ती प्रशिक्षक गणेश भिसे सरांचे कौतुक व अभिनंदन केले. तसेच मुख्याध्यापक नरेंद्र सिंग चाैव्हान,शाळा समन्वयक सुशील दीक्षित, व सर्व क्रीडा प्रशिक्षक , शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सदर विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close