कवडीपूरची झेडपी माॅडेल स्कुल दिशादर्शक होण्यासाठी प्रयत्न करणार-मोहिनीताई नाईक
माॅडल स्कूल बांधकामाचे मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन

पुसद : तालुक्यातील कवडीपुर येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसाठी मंजूर झालेल्या माॅडल स्कुलला सर्व सोईंनी युक्त अशी तालुका,जिल्हा नव्हे तर राज्याला दिशादर्शक बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मत राज्यमंत्री अॅड.इंद्रनिल नाईक यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या मोहिनीताई नाईक यांनी व्यक्त केले.
त्या पुसद पंचायत समितीतील भोजला केंद्रातील कवडीपूर तांडा येथील उच्च प्राथमिक शाळेसाठी खनिकर्म विकास निधी २०२४ अंतर्गत १ कोटी १९ लक्ष रुपयांमध्ये मंजूर झालेल्या माॅडल स्कूलच्या बुधवारी (ता.८ ) आयोजित भूमिपूजन समारंभात उद् घाटक म्हणून बोलत होत्या.कार्यक्रमाला कवडीपूरचे सरपंच मयुर राठोड,ग्राम पंचायत सदस्य प्रकाश चव्हाण,संतोष पवार,संजय वानखेडे, संजय सूर्यतळ, शंकर राठोड, पांडुरंग गायकवाड,सखाराम चव्हाण, बळीराम राठोड, कैलास चव्हाण , दुर्गासिंग चव्हाण, विजय चव्हाण, मधुकर पाटील, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत पंडितकर,कंत्राटदार वैभव बजाज,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अभय पवार,बाळू बाभणे,प्रवीण राठोड, गणेश पवार,युवराज आडे, ऋतिक चव्हाण,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र तालंगकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. यानंतर शाळेतील चिमुकल्यांनी स्वागतगीत सादर करुन उपस्थितांचे शब्दसुमनाने स्वागत केले.खनिकर्म विकास निधीतून माॅडेल स्कुल बांधकामासाठी कवडीपूर येथे दुमजली पाच वर्गखोल्या,दोन वाॅशरुम,एक मुख्याध्यापक खोली, एक ग्रंथालय,जिना, गेटसह डायस व संपूर्ण व्हरांडा ग्रीलने बंदिस्त अशी एक कोटी एकोणवीस लक्ष नव्व्यान्नव हजार चारशे पाच रुपयांमधून इमारत होणार असून शाळेला सर्व सोईंनी युक्त करुन राज्यासाठी दिशादर्शक ठरेल असे बनविण्याचे आश्र्वासन मोहिनीताई नाईक यांनी दिलेयावेळी पदविधर विषय शिक्षक शशिकांत जामगडे यांनी ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समितीतर्फे जमिन सपाटीकरण, सुरक्षाभिंत. ,कुपनलिका, विद्युतीकरण,जलमनीयंत्र,रंगमंच,क्रीडा साहित्य, संगणक लॅब आदी भौतिक सुविधांसाठी एक कोटी रुपयांची मागणी केली व सरपंच व शाळा व्यवस्थापन समितीतर्फे राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांना मोहिनीताई नाईक यांचे मार्फत निवेदन दिले.यावेळी गावातील दोन्ही किडण्या निकामी झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जिल्हा परिषद शाळेतर्फे पाच हजार रुपयांची मदत मोहिनी नाईक यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संध्या बेद्रे,रंजना कोटगीरवार, करुणा काळे,मनिषा काण्णव,सीमा येरावार, माधव कानगुले,ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, गावातील युवक मंडळ आदींनी पुढाकार घेतला.



