ईतर

जरांगे पाटील संवाद बैठकी संदर्भात मराठा समाजाची बैठक संपन्न!

पुसद,: मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा समाज गाठी भेटी दौऱ्यानिमित्त पुसद येथे सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (ता.२९) मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृह पुसद येथे सुसंवाद बैठकी संदर्भात सभा संपन्न झाली. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाज गाठीभेटी दौऱ्याच्या चौथ्या टप्प्याचे आयोजन ता.१ डिसें. पासून करण्यात आले अाहे. पुसद येथे जरांगे पाटील हे ता. पाचला मुक्कामी येत असल्याने सकल मराठा समाज पुसदतर्फे सुसंवाद बैठक आयोजित करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. सभेला हिंगोली येथील समन्वयक कल्याण देशमुख, श्री सवंडकर, अमोल देशमुख,दिग्रस नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे यांच्यासह पुसद येथील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेत कल्याण देशमुख यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्या बाबतची इत्यंभूत माहिती देऊन संवाद बैठक यशस्वी करण्याचे आवाहन केले. तसेच कुठल्या प्रकारच्या सामाजिक,जातीय मतभेद होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करुन जरांगे पाटील यांच्या दौऱ्याची आचारसंहिता सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुसद येथे मंगळवारी (ता.५)माहूर रोडवरील गणोबा मंगल कार्यालय पुसद येथे संवाद बैठकीचे आयोजन सायंकाळी ६.०० वा.करण्यात आले असून समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज पुसद तर्फे करण्यात आले आहे.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण ढेकळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रशांत गावंडे यांनी मानले.सभेला सकल मराठा समाजाच्या भगिनींसह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close