महाराष्ट्रात भाजपची घोडदौड, पण पुसद नप निवडणुकीत अपयशाचा धक्का; निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी न दिल्याने पराभव! ज्या नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी ही निवडणूक हाती घेतली होती त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा भाजप कार्यकर्त्यांची दबक्या आवाजात मागणी!

पुसद : नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाने मोठा राजकीय धक्का देत नगराध्यक्ष पदावर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अप)पक्षाच्या उमेदवार ॲड .सौ.मोहीनीताई इंद्रनील नाईक यांनी महाविकास आघाडीच्या व भाजपच्या उमेदवारचा पराभव करत नगराध्यक्ष पदावर आपले नाव कोरले आहे. या निकालामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते माजी आमदार ॲड .निलय नाईक भाजप पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरतीतिई फुपाटे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या या लढतीत त्यांना दारून पराभव स्वीकारावा लागला आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपला फक्त ५ जागांवर समाधान मानावे लागले आहे.महाराष्ट्रभर भाजपने नगरपरिषदेच्या निवडणुकांत चांगली कामगिरी करत राजकीय वर्चस्व सिद्ध केलं असताना, पुसद नगरपरिषद निवडणुकीत मात्र भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे. नगराध्यक्ष पदासह पॅनल मधील ५ नगरसेवक पदाचे उमेदवार सोडले तर अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची अभूतपूर्व नामुष्की भाजपवर ओढवली असून, या निकालामुळे पक्षांतर्गत गटबाजी उघडपणे समोर आली आहे. या निवडणुकीत भाजपकडून लढविण्यात आलेल्या संपूर्ण पॅनलला जवळपास मतदारांनी नाकारले, इतकेच नव्हे तर आवश्यक मतांची टक्केवारीही न गाठल्याने अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याची सूत्राची माहिती आहे.
राज्यभरात भाजप सत्तेचा झंझावात असताना, पुसद शहरात भाजपला जबरदस्त धक्का बसला आहे.या पराभवामागे पक्षातील अंतर्गत मतभेद, संघटनात्मक विस्कळीतपणा आणि स्थानिक नेत्यांना डावलण्याची भूमिका कारणीभूत ठरल्याचा आरोप खुद्द भाजप पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी पक्ष वाढवला, ज्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन इतरांशी दुश्मनी घेतली,आंदोलन केले अंगावर खोट्या केस घेतल्या त्यांना निवडणुकीच्या तोंडावर या प्रक्रियेतुन जाणिवपूर्वक डावले आणि निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या लोकांना सोबत घेवून निष्ठावंत कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना डावले पक्ष हा आता शहरांतील भांडवलदारांच्या, श्रीमंतांच्या हाती गेल्याने श्रीमंती आणि पैसा बघून इथे प्राधान्य दिले जाते. चाटुगिरी, भामटेगिरी, पुढे-पुढे करणाऱ्याला प्राधान्य दिले जाते हीच मानसिकता या पक्षात पाहवयास मिळत आहे.हा पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारांचा पक्ष आहे.पंरतु ही निवडणूक ज्या वरिष्ठ नेत्यांनी हातात घेतली होती त्यांनी मात्र जाणीवपूर्वक विरोधी पक्षाला फायदा होईल असेच प्रयत्न करुन निवडणुक लढविली असल्यानेच पक्षासाठी पोषक वातावरण असताना सुद्धा पक्षाला मोठा धक्का बसला असल्याची दबक्या आवाजात स्थानिक भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे. त्यामुळे स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.पुसद भाजप जिल्ह्यात पुसद जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष अशी स्वतंत्र संघटनात्मक रचना असतानाही, जिल्हाध्यक्ष डॉ.आरतीताई फुपाटे तसेच प्रभारी निवडणूक प्रमुख माजी आमदार ॲड.निलय नाईक यांनी शहरातील नगरपरिषदेच्या निवडणुकीत थेट हस्तक्षेप केल्याचा आरोप होत आहे. शहरातील संघटना, इच्छुक उमेदवार आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता तसेच सत्ताधारी पक्षाला पोषक वातावरण निर्माण होईल असे काही उमेदवारांना उमेदवारी देऊ एक प्रकारे चुपी युती झाल्याची ही चर्चा होती की काय?असा प्रश्न पक्षातील कार्यकर्ते विचारु लागले आहेत.तर दुसरीकडे नगरसेवक पदासाठी ही निष्ठावंत कार्यकर्त्यांना किंवा पक्षाची वेळोवेळी धुरा सांभाळणाऱ्या पदाधिकाऱ्याला डावल्याने तसेच उमेदवारी वाटप करत व प्रचाराची दिशा ठरविण्यात आल्याने असंतोष वाढला होता त्यामुळे निवडणुकीत त्याचाही भाजपला मोठा फटका बसला आहे.फक्त संघटनात्मक हस्तक्षेपच नव्हे, तर पक्षाकडून मिळालेला निवडणूक निधी सुद्धा प्रभागातील कार्यकर्त्यांपर्यंत योग्यरित्या पोहोचवला गेला नसल्याचा गंभीर आरोपही भाजप केला जात आहे. विरोधकासाठी पोषक वातावर निर्माण केल्याने तसेच प्रचार यंत्रणा कमकुवत राहिल्याने आणि पक्षातील अंतर्गत मतभेद, संघटनात्मक विस्कळीतपणा आणि स्थानिक नेत्यांना डावलण्याची भूमिका व नेत्याचा मनमानीपणा,कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या सोबतचा समन्वयाचा अभाव असल्याने भाजपचे संपूर्ण पॅनल मतदारांपर्यंत पोहोचू शकली नाही, त्यामुळे पक्षाचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तिसऱ्या नंबरवर गेल्याची सूत्राची माहिती आहे.या दारुण पराभवानंतर भाजपमध्ये संतापाची लाट उसळली असून, त्यामुळे पुसद जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षासह ही निवडणूक ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी हातात घेतली होती त्यांच्या राजीनाम्याची किंवा थेट हकालपट्टीची मागणी दबक्या आवाजात पदाधिकारी करीत आहेत. पुसद शहरातील भाजप पदाधिकारी आणि पराभूत उमेदवारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण,तसेच महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार करण्याचा निर्णय घेतला असल्याची सूत्राची माहिती आहे.



