ईतर

महागांव पोलीस स्टेशन हद्दीतील घटना!चारचाकी वाहनांतून अवैधरीत्या गोवंश मासची वाहतुक करणा-या इसमांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

महागाव : पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या गौवंश मांसाची वाहतूक करताना एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने चारचाकी वाहनांसह ताब्यात घेतले ११० कीलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सूत्राने झेप न्यूज ला दिलेली माहिती अशी की,यवतमाळ जिल्हात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिंता (भा.पो. से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने दि,१४ ऑक्टोंबर २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक महागांव पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी मिळाली कि, मौजे पेढी येथील इसम नामे शेख अकील शेख मिरांजी हा त्याचे चारचाकी वाहनांतून गौवंश मांसची वाहतुक करीत असल्याबाबत माहीती मिळाल्याने नमूद पथकाने पेढी-पोखरी रोडवर सापळा रचून सदरचे वाहन क्रमांक एम एच ०५ ऐजे६५२१ थांबवून चेक केले असता त्यामध्ये ११० किलो गोवंश मांस प्रतिकिलो २४० प्रमाणे असा एकूण २६४००/- व सदर वाहन किंमत रु १०००००/- रु असा एकूण १२६४००/- रु मुद्देमाल बाबत पशू वैद्यकिय अधिकाऱ्यांना अभिप्राय घेवून त्याप्रमाणे पंचनामा करुन ताब्यात घेवून इसम नामे शेख अकील शेख मिरांजी वय ४३ वर्ष, रा. पेढी ता. महागांव जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन महागांव येथे गुन्हा दाखल केला आहे.सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श कुमार चिंता (भा.पो. से) अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ पियुष जगताप (म.पो. से) सा तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि धिरज बांडे, पोउपन ि शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, सफो मुन्ना आडे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा / कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, पोउपनि रविंद्र श्रीरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close