अनुसूचित जाती-जमातीच्या आर्थिक निकषास विरोध आज ‘पुसद शहर बंदची हाक’, महामहीम राष्ट्रपतींना निवेदन देऊन केला निषेध व्यक्त!

पुसद:अनुसूचित जाती-जमातींच्या आरक्षणाच्या अंतर्गत सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज २१ ऑगस्टच्या रोजी भारत बंदला पुसद तालुक्यातील विविध सामाजिक संघटना राजकीय संघटना व अनुसूचित जाती जमाती वर्गातील समाज बांधवांनी उस्फूर्त पाठिंबा देऊन आपला निषेध व्यक्त केला.
१ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या सात न्यायाधिशांनी ६ विरुध्द १ मातांनी अनुसुचित जाती/जमाती च्या आरक्षणात उपवर्गकिरण करण्याचा आणि क्रिमिलीयर चीअट घालण्याचा निर्णय दिलेला आहे.तसेच आरक्षणाचा लाभ एकदा घेतल्यानंतर पुन्हा घेता येणार नाही असंही एका न्यायाधिशांनी नमूद केले आहे. सामाजीक न्यायाच्या दृष्टीने आणी नैर्सगीक व्यापाच्या दृष्टीने वरील निर्णय हे अनुसुचित जाती जमातीच्या वर्गाच्या हिताच्या दृष्टीने अन्यायकारक आहे.आरक्षणात आरक्षण आणी त्यात अ.ब. क.ड.४ मध्ये उपवर्गीकरण हे कोणत्याही दृष्टीने समर्थनीय नसल्याने भारतीय संविधानाच्या कलम ३४१ व ३४२ चे उल्लंघन करून राष्ट्रपतीच्या अधिकारात हस्तक्षेप तसेच कलम १४,१५, १६,चे उल्लंघन आहे. याचा आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने निषेध व्यक्त करतो व हे केवळ घेतलेला निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.या करीता पुसद शहरातील राजकीय पक्ष तथा सामाजीक संघटना व अनुसूचित जाती, जमातीचे समाज बांधव, संविधान प्रेमी राजकीय संघटना मिळून संयुक्त रित्या या बंदला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे. ह्या भारत बंदच्या दिवशी निवेदनावर अनेक समाज बांधव तसेच राजकीय, सामाजिक व अनुसूचित जाती जमातीचे समाज,तथा कर्मचारी बांधवांच्या स्वाक्षऱ्या करून उपविभागीय अधिकारी पुसद यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन पाठविण्यात आले असून या निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला आहे.
पुसद बंद आंदोलनात सहभागी संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) पुसद, भीम आर्मी भारत एकता मिशन, बिरसा मुंडा ब्रिगेड, भिम टायगर सेना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदयीकरण सहनियंत्रण समिती पुसद, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, भिभशक्ती संघटना, भारतीय बौद्ध महासभा पुसद, प्रज्ञापर्व २०२४ उत्सव समिती, समता सैनिक दल, एम.आय.एम.पक्ष इत्यादी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते, कर्मचारी वर्ग तसेच सर्व समाज बांधव सहभागी होते. हा भारत बंद मोर्चा तीन पुतळा परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक, सुभाषचंद्र बोस चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, महात्मा गांधी चौक तहसील परिसर मार्गाने बहुसंख्येने निघाला होता