सामाजिक

स्व.सतीष बयास निर्भीड व निर्मल असे व्यक्तीमत्व-ॲड.आशिष देशमुख

प्रथम स्मृती दिना निमीत्त स्वर्ग रथाचे लोकार्पण संपन्न!

पुसद :माजी नगराध्यक्ष स्व. सतीष बयास हे निर्भीड व निर्मल असे व्यक्तीमत्व होते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते. प्रत्येक समाजाच्या कुटुंबाशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. कोणी चुकला तर ते स्पष्ट बोलुन दाखविणारे निर्भीड असे त्यांचे व्यक्तीमत्व होते. आतुन व बाहेरुन निर्मल व प्रेमल असणारे सतीषभाऊ यांचा लोकसंग्रह हा फार मोठा होता. असे गौरव उदगार गोवा व महाराष्ट्र बार कॅान्सीलचे सदस्य ॲड. आशीष देशमुख यांनी काढले.स्व.सतीष बयास यांचे प्रथम दिना निमीत्त आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन ॲड. देशमुख बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, आमदार ॲड. निलय नाईक, आमदार ॲड. इंद्रनिल नाईक, महंत सुनिल महाराज पोहरागड, डॅा. अकील मेमन माजी उपाध्यक्ष न.प.पुसद , डॅा. मोहम्मद नदीम कॅाग्रेस नेते, दिपक आसेगावकर अध्यक्ष मानव सेवा समिती पुसद, राम देवसरकर माजी जि .प.बांधकाम सभापती, विजय जाधव सचिव युवक मंडळ पुसद, नितीन भुतडा माजी जिल्हाध्यक्ष भा.ज.पा., अभिजित वायकोस मुख्याधिकारी न.प.पुसद, निशांत बयास अध्यक्ष विश्वनाथसिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद उपस्थित होते.

स्व. सतीष बयास यांचे प्रथम स्मृती दिना निमीत्त विश्वनाथसिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद च्या वतीने मोक्षधामास नविन, अत्याधुनिक व वातानुकुलीत असा स्वर्गरथ सामाजिक उपक्रमांतर्गत भेट देण्यात आला. मानव सेवा समितीचे अध्यक्ष दिपक आसेगावकर व सर्व संचालक यांना या नविन स्वर्गरथाची चावी या वेळी उपस्थित मान्यवरांनी प्रदान केली.सतीष बयास यांचे व्यक्तीमत्व किती मोठे होते या ठिकाणी जमलेल्या उपस्थितीवरुन लक्षात येते सतीषभाऊ हे स्वच्छ प्रशासन करणारे असे आदर्शी प्रशासक होते. अडचणीच्या प्रसगांत त्यानी मला सतत साथ दिली अतिशय प्रेमळ व आधार देणार असे व्यक्तीमत्व सतीशभाऊचे होते. त्यांचे ऋण मी कधीही विसरु शकत नाही. मी सदैव बयास परिवाराच्या सोबतच आहे. असे उद्गार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलतांना आमदार ॲड निलय नाईक यांनी काढले.
राजकारणातुन समाजकारण साधणारे व उत्कृष्ठ मार्गदर्शन करणारे असे सतीशकाकांचे व्यक्तीमत्व होते. माझे विधानसभा निवडणुकीच्या वेळी सतीश काका यांनी पुसद शहराची जबाबदारी स्विकारत माझ्या निवडुन येण्यामध्ये मोठा हातभार लावला असे असे उद्गार या वेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलतांना आमदार ॲड इंद्रनिल नाईक यांनी काढले मी सदैव निशांत बयास यांचे खाद्याला खांदा लावुन भविष्यातही आजच्या सारखेच काम करुन सदैव बयास यांचे सोबत राहील असे आमदार नाईक यांनी यावेळी बोलतांना सांगीतले.स्व. सतीषभाऊ हे पहिले असे गैरबंजारा समाजातील व्यक्तीमत्व होते. ज्यांनी पोहरादेवी संस्थानला दान दिले होते. अशी आठवण यावेळी बोलतांना प्रमुख पाहुणे महंत सुनिल महाराज यांनी काढले. अध्यामिक व सामाजिक अश्या दोन्ही गोष्टीचा समतोल साधणारे व्यक्तीमत्व सतीषभाऊचे होते. असे उद्गार सुनिल महाराज यांनी काढले.यावेळी बोलतांना डॅा. अकिल मेमन यांनी स्व. सतीषभाऊच्या अनेक आठवणी सांगीतल्या माजी राजकीय गुरु तसेच माझे सल्लागार म्हणुन सतीषभाऊ सतत पाठीशी होते. त्यांच्या जाण्याने माझे कौटुंबिक नुकसान झाले. राजकीय, सामाजिक व शेती क्षेत्रातील जाण असलेला व्यक्तीमत्व म्हणजे सतीषभाऊ होते असे डॅा. मेमन यांनी यावेळी सांगीतले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना डॅा. मोहम्मद नदीम यांनी सांगीतले की, किरदार को दागी होने नही दिया उसने असा प्रकारचे आदर्श असे राजकारणातील एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे स्व. सतीषभाऊ होते. आज अशा प्रकारे आदर्शपणाची शिकवणुक देणारे व्यक्ती शहरामध्ये राहिले नाही. माझे अंतकरण या ठिकाणी बोलताना जड होत आहे. हे माझे सच्चे मित्र होते. असे भावनिक उद्गार डॅा. नदिम यांनी यावेळी काढले.बयास परिवाराने मोक्षधामाला सतत भरीव अशी मदत केली आहे. वाढदिवसाच्या दिवशी जमलेले दोन लाख रुपये सतीषभाऊ यांनी मोक्षधामाला समर्पीत करुन एक आदर्श सर्वापुढे ठेवला. तर आज त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ अत्याधुनिक असा स्वर्गरथ बयास पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत मोक्षधामास निशांत बयास यांनी समर्पीत केला तसेच यापुर्वी मोक्षधामातील साऊंड सिस्टीम निशांत बयास यांनी व्यवस्थित करुन दिला. अशी माहिती दिपक आसेगांवकर यांनी बोलतांना सांगीतले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक निशांत बयास यांनी केले तर आभार प्रदर्शन नारायण क्षीरसागर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वायकोस सर यांनी केले. यावेळी निळे सर व संच यांनी उत्कृष्ट व भावपुर्ण असे गायन सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता मनिष शहा व मित्र मंडळाने अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close