नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादित करणाऱ्या कु.वैष्णवी राठोडचा हिवरा ग्रामपंचायत तर्फे घरी जाऊन सत्कार!

महागाव/प्रतिनिधी ( संदीप कदम):-पुसद मतदार संघातील व महागाव तालुक्यातील पोखरी तांडा या अतिशय दुर्गम भागात राहणारी कुमारी वैष्णवी रोहिदास राठोड हिने अतिशय कठीण असणाऱ्या नीट परीक्षेत ७२० पैकी ७०० गुण प्राप्त करून घवघवीत यश मिळविले व समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे कु. वैष्णवी राठोड ही तांड्यासारख्या एका दुर्गम भागामध्ये टिन पत्राच्या अतिशय साध्या घरामध्ये राहत असून सुद्धा तिने या नीट परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून उंच भरारी घेतली आहे.
आज हिरा संगम ग्रामपंचायतच्या सरपंच व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.मेघाताई शिरीष बोरुळकर यांनी वैष्णवीच्या घरी जाऊन तिचा सत्कार करून तिचि आई सुनीताबाई यांचा सुद्धा सत्कार केला आहे सुनिता बाई यांना वैष्णवी व अश्विनी या दोन मुली असून मोठी बहीण अश्विनी ही बी. एम .एस. करत आहे या दोन्ही मुलींना घडवितांना सुनिता बाईचे अपार कष्ट आहेत त्या कष्टांचे या दोन्ही मुलींनी आज कष्टाची किंमत केली आहे वैष्णवी चा सत्कार करून पेढा भरून तिचे अभिष्टचिंतन करून तिला भविष्याच्या पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या बारा वर्षांपूर्वी वडिलांचे छत्र हरविलेल्या वैष्णवीला व अश्विनी ह्या दोघ्या बहिणीला आई सुनीताबाईने खूप कष्टाने दोन्ही मुलींना उच्चशिक्षित केले आहे याच्यामध्ये त्यांच्या मामा व इतर नातेवाईकांचे सुद्धा मोलाचं सहकार्य आहे यावेळी हिवरा ग्रामपंचायतचे उपसरपंच शरद पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजूभाऊ धोतरकर, रमेशराव भुसारे, शिरीष बोरुळकर , लखन कदम यांनी वैष्णवी ला खूप खूप शुभेच्छा दिल्या यावेळी गावकरी व इतर संघटनेचे पदाधिकारी पत्रकार सुद्धा उपस्थित होते