आदिवासी समाजाचा विदर्भातील एकमेव आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अनिल तोरकड याला अमरावती-२०२५ समाज भूषण पुरस्काराने सन्मानित

अमरावती/ प्रतिनिधी : विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवराचा लाईफ डेव्हलपमेंट सोसायटी क्रीडा क्षेत्राद्वारे आयोजित अमरावती समाज भूषण -२०२५ नुकताच ॲनिमेशन कॉलेज येथे पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी विविध मान्यवरांना समाज भूषण गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. सौरभ कटियार जिल्हाधिकारी अमरावती तर प्रमुख पाहुणे नवीनचंद्र रेड्डी पोलीस आयुक्त अमरावती होते.यावर्षी हा पुरस्कार पुसद तालुक्यातील माळ पठारावरील डोंगरदऱ्यात वसलेल्या आदिवासी पाड्यातील नानंद ईजारा येथील रहिवाशी असलेला व हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे कुस्ती सराव करीत असलेला आदिवासी समाजाचा पहिला विदर्भातील चार वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणारा कुस्तीपटू व पाच वेळा राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता अनिल काळूराम तोरकड यांचा अमरावतीचे पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेडी यांच्या हस्ते ॲनिमेशन कॉलेज येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात अमरावती भूषण पुरस्कार-२०२५ यांना मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते. या कुस्तीपटूला हा पुरस्कार मिळाल्यावर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.