ईतर

कृषी दिनानिमित्त ओंकारेश्वर मंदिर श्रीरामपूर येथे वृक्षारोपण!

पुसद: तालुक्यातील श्रीरामपूर ग्रामपंचायतचे हद्दीतील ओंकारेश्वर मंदिर येथे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जयंती कृषी दिनानिमित्त ओंकारेश्वर मंदिर संस्थान व श्रीरामपूर ग्रामपंचायतीच्य संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी ओंकारेश्वर मंदिर परिसरात वृक्षारोपण श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष काळबांडे, विश्व हिंदु परिषदेचे अध्यक्ष भारत अण्णा पेन्शनवार,विजय राठोड, राजू भाऊ आसेगावकर, ग्रामविकास अधिकारी श्रीरामपूर,

 

व अदी ग्रामपंचायत सदस्य तसेच अमोल काजळे,अध्यक्ष, ओंकारेश्वर मंदिर, प्रा. डॉ.अनुश्री पुरी उपाध्यक्षा, ओंकारेश्वर मंदिर,सुनील गुद्धटवार सचिव, प्रल्हाद काजळे, सहसचिव, सचिन मते, प्रमोद मिसाळ, विजय हिंगमिरे, अविनाश खापरे,सौ,वर्षा काजळे व इतर ओंकारेश्वर मंदिर मधील सदस्य तसेच भाविक भक्त यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.व कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर वृक्षारोपण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थानचे सचिव सुनील गुद्धटवार यांनी केले. तर आभार संस्थानच्या उपाध्यक्षा प्रा.डॉ.अनुश्री पुरी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close