माउंट लिटरा झी स्कूल मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा!

पुसद: शहरातील माउंट लिटरा झी स्कूलमध्ये दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे योग शिबिरात सहभाग घेतला. योग हा भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असून योगाचे महत्त्व जगाला समजले आहे. २०१५ पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर २१ जून हा दिवस योग दिवस म्हणून साजरा केला जात आहे. सदर शाळेत योग दिनाच्या या कार्यक्रमास योग गुरु कन्हैयाजी विची यांनी विद्यार्थ्यांना विविध योगाचे प्रात्यक्षिक करून दाखविले .व विद्यार्थ्यांकडून करून घेतले. तसेच योगाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष विक्रमजी गट्टाणी आणि उपाध्यक्ष अमरजी आसेगावकर ,संस्थेचे सचिव मा.संदीपजी जिल्हेवार ,संस्थेचे कोषाध्यक्ष रवीजी गट्टाणी, संचालक भागवतजी चिद्दरवार.तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शाळेचे मुख्याध्यापक,शाळा समन्वयक व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांनी योग शिबिरास सहभाग घेतला .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व क्रीडा प्रशिक्षक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आकाश खंदारे यांनी केले .