तरुणांची धारदार शस्त्राने वार करुन हत्या; वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद : वसंत नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील व हाकेच्या अंतरावर असलेल्या ठिकाणी दि.१ नोव्हेंबर २४ रोजी रात्री अंदाजे १०:०० ते१०:३० वाजण्याच्या सुमारास वसंत नगर येथील एका तरुणाची धारदार शस्त्राने सपासप वार करुन हत्या केली असल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.याबाबत पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, दि.१ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रात्री अंदाजे १०:०० ते १०:३० वाजण्याच्या वसंत नगर पहिली गल्ली मालानी हॉस्पिटलच्या बाजूला वसंत नगर येथील रहिवासी असलेल्या विशाल संजय लोखंडे वय अंदाजे २४ वर्ष या तरुणाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या करण्यात आली. सदर घटनेचे कारण अद्याप समोर आले नाही. सदर घटनेत मय्यत लोखंडे याचे पोटावर व छातीवर धारदार शस्त्राचे सपासप वार झाले असल्याचे प्राथमिक माहिती मिळाली आहे.सदर घटनेची माहिती वसंत नगर पोलीस स्टेशनला होताच , त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा केला. सद्यस्थितीत मय्यत संजय लोखंडे याच्या मृतदेहास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले. घटनेच्या काहीच वेळात डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाची पाहणी केली. सदर घटना कशामुळे झाली व सदर घटने मागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. सदर घटनेचा तपास डीवायएसपी हर्षवर्धन बीजे यांच्या मार्गदर्शनाखाली वसंत नगर पोलीस करीत आहे.



