ईतर

पुसद शहरात भव्य आक्रोश मोर्चाला अभुतपुर्व प्रतिसाद; विविध सामाजिक संघटनाचा मोर्चास पाठींबा!

आदिवासी कृती समितीचा पुढाकार

पुसद: मणिूपर राज्यात महिलांची विवस्त्र करून धिंड काढणाऱ्या आराेपींविरुद्ध कठाेर कारवाई करण्यासह मणिपूर राज्य शासन बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी कृती समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी पुसद कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.

उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत देशाच्या महामहीम राष्ट्रपतीनां विविध मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले़.मणिपूर येथील घटनेच्या निषेधार्थ आदिवासी कृती समितीच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता मणिपूर येथील ही घटना अमानवीय आहे़ तसेच या घटनेमुळे आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे़.

याप्रकरणी तक्रार केल्यानंतर दाेन महिने कारवाई करण्यासाठी लागले़ या प्रकरणाची सर्वाेच्च न्यायालयाने दखल घेत सुनावणी ठेवली आहे़ दुसरीकडे केंद्र आणि राज्य सरकारने कुठलीही कारवाई केली नसल्याचे निवेदनात म्हटले आहे़.

त्यामुळे आदिवासींवर होणारे अत्याचार थांबविण्यासाठी दोषीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. मनिपूर घटनेतील सर्व आरोपींना तत्काळ अटक करुन त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

हा भव्य आक्रोश मोर्चा क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राचे पुजन करुन अभिवादन करण्यात आले व मोर्चाला महिलामंडळाच्या नेतृत्वात सर्व धर्मीय सामाजिक संघटनांच्या वतीने जयघोष करीत सुरुवात करण्यात आली.या चौकातून महात्मा फुले चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, मार्केट यशवंत रंगमंदिरावर पोहोचल्या नंतर या मोर्चाचे भव्य सभेत रूपांतर झाले त्यावेळी विविध मान्यवरांनी या सभेला संबोधित केले.

क्रार्यक्रमाच्या शेवटी आदिवासी कृती समितीच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी आदिवासी आक्रोश मोर्चा कृती समिती पुसद, चे अध्यक्ष माधवराव वैद्य, कार्याध्यक्ष सुनिल ढाले, उपाध्यक्ष सुरेश धनवे, सचिव नारायण कऱ्हाळे, तसेच सदस्य ज्ञानेश्वर तडसे, रंगराव काळे, ॲड रामदास भडंगे, फकीरा जुमनाके, पांडुरंग व्यवहारे, गजानन उघडे, गणपत गव्हाळे, हरिदास बोके, राजू तडसे, गजानन टारफे, सुदाम चिरंगे, संतोष गारूळे, नामदेव इंगळे, गजानन टाले, समाधान बळी, ॲड संदीप कोठुळे, लक्ष्मण पांडे, शिवाजी तोरकड प्रसिद्धी प्रमुख मारोती भस्मे, सुनीताताई मळघने, मिना व्यवहारे, शिल्पा सरकुंडे, मनिषा बेले, आशाताई पांडे, वर्षाताई वैद्य, शितल ढगे, फरझाना बि शेख रज्जाक, हमिदाबी शेख जाफर, आफिजा ल शेख शब्बीर, निशोबी

डॉ.मोहम्मद नदीम, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले, मराठा सेवा संघाचे सुधीर देशमुख, प्रज्ञापर्व समितीचे अध्यक्ष किशोर कांबळे, काँग्रेस पक्षाचे डॉक्टर मोहम्मद नदीम अजय पुरोहित, शितलकुमार वानखेडे, तेहसिनी खान, भारतीय बौद्ध महासभा भारत कांबळे, रिपब्लिकन पक्षाचे लक्ष्मण कांबळे,सरपंच संघटनेचे अध्यक्ष आशिष काळबांडे, आदिवासीं सेवक, रामकृष्ण चौधरी, कुस्ती मल्लविद्या महासंघ नाना बेले, माजी जी प सदस्य परशराम डवरे आदी सह शेकडो कार्यकर्ते पदाधिकारी यांचा सहभाग होता.

हा भव्य आक्रोश मोर्चा जसा जसा समोर जात होता तसा तसा नांगरिकांचा सहभाग वाढत जात होता या अभुतपुर्व भव्य आक्रोश मोर्चा पाहण्यासाठी पुसदवासियांनी तुफान गर्दी केली होती. सदरच्या मोर्चात शहरासह तालुक्यातील हजारो महिला पुरुषांनी जेष्ठ नागरिकांनी, विविध सामाजिक संघटनांनी समाजातील मान्यवरांनी सहभाग घेतला होता तर पुसद पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close