मारहाण प्रकरणात आरोपीस सक्त मजुरी व दंड;पुसद न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

पुसद: येथील न्यायालयातील न्यायमूर्ती विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी जी. एस. वरपे यांनी मारहाण प्रकरणातील आरोपीना सहा महिने सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.याबाबत न्यायालय सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, दि.२१एप्रिल२०१३रोजी मौजे लाखी तालुका पुसद येथील दिलीप किसन राठोड, माया दिलीप राठोड, कुणाल दिलीप राठोड हे सकाळी १०:३० सुमारास आरोपी विलास किसन राठोड, सौ. शीला विलास राठोड, अमित विलास राठोड यांचे सह शेतात मोजणी करण्याकरिता गेले असता मोजणी करून घरी परत येत असताना आरोपींनी आम्हाला मोजणी मान्य नाही या कारणावरून वाद निर्माण करून आरोपीने दिलीप राठोड यास कुऱ्हाडीने कानावर मारून गंभीर जखमी केले तसेच माया व कुणाल यास गजाने व काठीने मारहाण करून जखमी केले सदर घटनेचे वेळी रवी उल्हास राठोड व त्याची पत्नी भांडण सोडविण्यास गेले असता आरोपीने त्यांच्या मागे लागुन मारण्यासाठी धावले अशा आशयाची फिर्याद पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथे रवी राठोड यांनी दाखल केली त्या फिर्याद वरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम ३२६, ५११, ५०४,५०६, प्रमाणे गुन्हा नोंदण्यात आला त्यानंतर तपास अधिकारी ए.एस. आय.व्यंकटेश मच्छेवार यांनी सदर प्रकरणात सखोल चौकशी करून अंतिम दोषारोप पत्र दाखल करुन आरोपीना न्यायालयात हजर केले. या प्रकरणात न्यायालयाने एकूण सात साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली त्यावरून विद्यमान न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी जी.एस.वरपे साहेब यांनी सहायक सरकारी वकील चंद्रकांत उके यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी विलास व अमित यांना भा. द.वी. चे कलम ३२६ व ५११ प्रमाणे प्रत्येकी सहा महिने सक्त मजुरी व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली तर आरोपी शीला विलास राठोड ही कोर्ट उठे पर्यंत शिक्षा आणि एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील यांनी प्रभावीपणे बाजू मांडली. विशेष म्हणजे सदर प्रकरणात वेळोवेळी पोहवा १७३९/ कैलास भिसे कोर्ट मोहरर पो.स्टे. ग्रामीण पुसद यांनी पुरावे दाखल करण्यासाठी मदत केली



