ईतर

सर्वपक्षीय बैठकीत पुसद अर्बन बँक व भारती मैंद पतसंस्थेच्या समर्थनार्थ ठेवीदारांनी गुंतवणूक करण्यासाठी पत्रकार परिषदेत केले आव्हान!

पुसद : गेल्या चाळीस वर्षापासून पुसद अर्बन कॉ ऑप बँक लि. तसेच तेविस वर्षापासून भारती मैंद पतसंस्थेच्या माध्यमातून या शहरातील छोट्या-मोठ्या अनेक व्यवसायिकांना नियमितपणे वेळोवेळी कर्ज वाटप करून उद्योगधंद्यांना चालना दिली जाते तसेच ठेवीदारांना वेळोवेळी व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितलेली रक्कम तात्काळ पुरवली जाते परंतु काही दिवसापासून ठेवीदारांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण झाल्याने या संस्था अडचणीत येऊ शकतात त्यामुळे या दोन्ही संस्थेच्या समर्थांनार्थ पुसद शहरातील विविध पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते तसेच जागरूक नागरिकांनी आज शासकीय विश्रामगृह सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करून पत्रकार परिषद घेण्यात आली व या पुसद अर्बन बँक मध्ये तसेच भारती मैद पतसंस्थेमध्ये जास्तीत जास्त ठेवीदारांनी गुंतवणूक करावी असे आव्हान करण्यात आले.

 आपल्या पुसद तालुक्यात ४० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या पुसद अर्बन कॉ ऑप बँक व २३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या भारती मैंद पतसंस्थेमार्फत बैंकिंगच्या क्षेत्रात सांगली मजल मारली असून या बँकांनी जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण राज्यात मोठे जाळे विणले आहे या दोन्ही संस्थामार्फत अत्यंत चांगल्या व तत्पर सेवा ठेवीदारांना व कर्जदारांना दिल्या जात असल्यामुळे छोटे-मोठे उद्योगाला चलना मिळत आहे.या दोन्ही संस्थामार्फत छोट्या व्यावसाईकांपासून ते मोठ्या व्यावसायिकांना व्यवसाय कर्ज, गृह, शिक्षण कर्ज अडिअडचणी मध्ये आपली हक्काची बँका म्हणून पाहिजे तेव्हा कर्ज सुविधा दिली जाते. तर शासनाच्या संजय गांधी, लाडकी बहीण सारख्या शासकीय योजनांचा तळागाळातील दिनदुबळ्या हजारो लाभार्थी खाते दारांना पुसद अर्बन बैंक तत्पर सेवा देत असते. दोन्ही संस्थांमध्ये व्यापारी, सर्च पक्षीय कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते संचालक म्हणून कर्तव्य बजावत आहेत. बँक व पतसंस्थेतील सर्व ठेवीदारांना आजपर्यंत त्यांच्या ठेविवरील व्याज तसेच त्यांनी खात्यातून मागितली तेव्हा पाहिजे तितकी रक्कम पुरविली आहे. दोन्ही संस्थांमध्ये सर्व काही सुरळीत सुरु असतांना मागील १ महिन्यात दोन्ही संस्थांमधील ठेवीदारांमध्ये चुकीचा संभ्रम निर्माण होऊन ठेवीदारांनी आपल्या ठेवी काही कारण नसताना काढून घेणे सुरु केल्यामुळे ज्या ठेवीदारांच्या पाठिंब्यामुळे ह्या संस्था उभ्या आहेत त्यांनीच अचानक ठेवी काढणे सुरु केल्याने बँक व पतसंस्थाच्या दैनंदिन व्यवहारावर विपरीत परिणाम पडत आहे. ठेवीदारांच्या गैरसमजुतीतुन विड्रॉल होत असल्याने अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणाऱ्या दोन्ही संस्थाच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित होऊ शकत्तो. तसेच आपल्या शहरांतील व भागातील बँकिंग ची सेवा देणाऱ्या हक्काच्या संस्था आपण गमावून बसु शकतो त्यामुळे ठेवीदारांनी यादुरगामी परिणाम करणाऱ्या या घटनेला टाळण्यासाठी पुसद अर्बन बँक व भारती मैंद पतसंस्थेवर ठेवीदारांनी विश्वास ठेवावा असे आवाहन आज विश्राम गृहावर झालेल्या सर्व पक्षीय बैठकीच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आले आहे तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी व ठेवीदारांनी या बँकांमध्ये पुन्हा आपल्या ठेवी सुरक्षित ठेवून या दोन्ही संस्थांना उभारी द्यावी असे सुद्धा आवाहन करण्यात आले.

या बैठकीला शहरातील सर्वपक्षीय नागरिकांनी हाजी लावली होती यावेळी नारायण क्षीरसागर, अँड.उमाकांत पापीनवार , डॉ.मोहम्मद नदीम ,राजन मुखरे ,पंजाबराव देशमुख खेडकेकर, राजेश साळुंखे , निशांत बयास ,बाळासाहेब पाटील कामारकर , भगवानराव शामराव आसोले, मो. इरफान मो.फयाज ,नितीन भुतडा , निखिल चिद्दरवार ,अनिरुद्ध पाटील , नाना बेले, निलेश पेन्शनवार ,सुरज डुबेवार ,संजय बजाज ,अनुकूल चव्हाण ,ओमप्रकाश शिंदे , ऋषिकेश पंडितकर , निखिल ठाकरे , गणेश पवार ,निखिल गादेवार ,अभिषेक पवार ,जिया शेख , करण ढेकळे, विनोद जिल्हेवार डॉ.अकिल मेमन अभिजीत पानपट्टे , वैभव देशमुख ,संग्राम देशमुख अभिलाष तगरपल्लेवार अनेक आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close