राजपूत भामटा बोगस प्रमाणपत्राची घुसखोरी थांबवण्यासाठी गोर सेना आक्रमक: सोमवारी महागाव येथे रस्ता रोको!

महागाव/प्रतिनिधी(संदीप कदम):महाराष्ट्रातील गोर बंजारा विमुक्त जाती (VJA) प्रवर्गातील आरक्षणात मूळ राजपूत भामटा सोडून इतर बिगर मागास समाजातील उदा. राजपूत,छप्परबंध, मीना, परदेशी जातीचे खोटे प्रमाणपत्र जोडून विमुक्त जाती (VJA) मोठ्या प्रमाणात घुसखोरी करीत आहे. त्यामुळे मूळ गोर बंजारा विमुत जाती (अ) यांच्यावर अन्याय होत आहे.आरक्षणातील ही घुसखोरी कायमस्वरूपी
थांबवावी व राजपुत भामटा जातीतून भामटा हा शब्द हटवण्यात येवू नये . या करीता मागील १ जून २०२३ रोजी महाराष्ट्रातील तिनसेच्या वर तहसीलदार व जिल्हाधीकारी यांना निवेदन देवूनही या रास्त अशा मागणीचा शाशन दरबारी विचार केला नाही म्हणून महागाव येथे येत्या सोमवारी दि. १९ जून २०२३ रोजी गोर सेना या सामाजिक संघटनेच्या वतीने रास्ता रोको आदोंलन करण्यात येणार आहे.या आंदोलनात महागाव,तालुक्यातील गोर सेनेच्या सर्व समाज बांधवानी व विमुक्त जाती प्रवर्गातील सर्व घटकांनी सहभागी ह्वावे असे आव्हान गोर सेना तालुका अध्यक्ष आजेश जाधव यांनी केले आहे.