पुसद शहरात अवैध धंद्यासह गुटख्याच्या विक्रीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे अभय..

पुसद : राज्यात गुटखाविक्रीवर कडक बंदी असतानाही पुसद शहरात पोलीस विभागाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाच्या हक्केच्या अंतरावर दिवसाढवळ्या अवैध धंद्यांना ऊत आला असून अवैध गुटख्याची विक्री खुलेआम सुरू आहे तरीही याकडे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे जाणीवपूर्वक धृतराष्ट्राचे सोंग घेऊन बसले असल्याचे ‘ झेप न्यूज’च्या पाहणीतून उघड झाले आहे.
पुसद पोलीस उपविभागात स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी आहेत परंतु या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी उपविभागात कोणतेही अवैध धंदे चालू देणार नसल्याचे पोलीस उपविभागातील जनतेला अस्वशित केले परंतु याच पोलीस उपविभागात त्यांच्याच पोलीस खात्यातील स्थानिक गुन्हे शाखेच्या आशीर्वादाने पोलीस उपविभागात अवैध धंद्यांना ऊत आला आहे. एरवी स्थानिक गुन्हे शाखेची पोलीस उपविभागात कारवाई केल्याचा अव.आणत असून आजपर्यंत या पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये किती गुन्हे निष्पन्न झाले हे मात्र संशोधनाचा विषय आहे.राज्यात गुटखाविक्रीवर कडक बंदी असतानाही पुसद शहराच्या विविध भागांतील गल्लीबोळात पानटपऱ्यांवर गुटखा आणि तत्सम प्रतिबंधित पदार्थ सहज मिळतात. यामागे असलेल्या गुटखा तस्कर व हाप्ते खाऊ पोलीस गब्बर होत चालले आहेत त्यामुळे या हाप्तेखाऊ पोलिसांमुळे गुटखा तस्करांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही निःपक्षपणे ड्युटी करणाऱ्या पोलिसांना मात्र अपयश येत आहे. ज्या हप्ते खाऊ पोलिसांचे या अवैध धंदेवाल्यांना अभय आहे ते मात्र कारवाई होण्याआधी धंद्याावाल्यांना माहिती देऊन या तस्करांना अवगत करत असतात त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या कारभारावर सर्वसामान्य नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहे.स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर गुटखा विक्री केंद्र असल्याने या प्रकाराला पोलिसांची मदत आहे की काय? अशी शंकाही व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. गुटखा विक्रीचा व्यवसाय खुलेआम सुरू असतानाही प्रशासनाचे मात्र या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. हे अवैध गुटखा विक्रीचे तालुक्याचे मुख्य केंद्र बनले आहे. शहरातून तालुक्यासमवेत जिल्ह्याबाहेरही अवैधरित्या गुटखा विक्री केली जात असल्याची सूत्राची माहिती आहे. पोलीस उपविभागात अवैध धंदे फोफावले आहे अवैध देशी दारू विक्री मटका जुगार आता गुटखा विक्रीच्या व्यवसायाने पुन्हा डोके वर काढले आहे. शहरामध्ये खुलेआम गुटख्याची विक्री होत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस प्रशासन पुसद कार्यालय या खात्याकडून या प्रकाराकडे पूर्णत: दुर्लक्ष केले जात आहे. गुटखा विक्री करणारे एक रॅकेट कार्यरत आहे. या रॅकेटच्या माध्यमातूूनच शहरातील विविध दुकाने आणि पानटपऱ्यांवर गुटख्यांच्या पुड्या सर्रास पोहोचविण्यात येतात. यामध्ये दररोज लाखो रुपयांची उलाढालही होते.या गुटखा विक्रीला याच पोलिसांचे अभय असल्याने अवैध मार्गाने येणाऱ्या गुटख्याची विक्री खुल्लेआम सुरू आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या कारभारावर सर्वसामान्य जनता प्रश्न उपस्थित करीत आहेत.



