शालेय कुस्ती स्पर्धेत को. दौ. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

पुसद : क्रीडा व युवक सेवा संचनालय, जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ जिल्हा किडा कार्यालय, यवतमाळ जिल्हा कुस्तीगीर परिषद व पुसद तालुका शारीरिक शिक्षक संघटनेच्या वतीने नुकतेच यवतमाळ जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा फुलसिंग नाईक महाविद्यालय च्या डहाणूकर सभागृहामध्ये घेण्यात आली. त्यामध्ये स्थानिक कोषटवार दौलतखान विद्यालय व गोधाजीराव मुखरे कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करून घवघवीत यश मिळवले. फ्रीस्टाइल कुस्ती मधील वयोगट चौदा वर्षातील पस्तीस किलोच्या वजन गटांमध्ये अमोल कार्तिक वंजारी ६२ किलो वजन गटामध्ये सुंदर मधुकर जाधव, वयोगट १७ वर्षातील मुलांच्या फ्रीस्टाइल स्पर्धेमधील ६० किलो वजन गटांमध्ये मितेंद्र मनोज पवार, ६२ किलो वजन गटांमध्ये आयुष सतीश कानडे, १७ वर्षातील मुलांच्या ग्रीको रोमन स्पर्धे मधील ५१ किलो वजन गटामध्ये सतीश मुळे, ५५ किलो वजन गटांमध्ये शिवम साहेबराव शिंदे, वयोगट १९ वर्षे मुलांच्या ग्रीको रोमन स्पर्धे मधील ५५ किलो वजन गटामध्ये ओंकार पंजाब काळे व ७७ किलो वजन गटांमध्ये प्रथमेश सतीश कानडे यांनी आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना चित करीत अमरावती येथे होणाऱ्या विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजूभाऊ कोटलवार, सभापती डॉ आनंद मुखरे, मुख्याध्यापक गजानन वायकुळे, उपमुख्याध्यापिका रीता बघेल, पर्यवेक्षक अनंत जाधव, बलराम मुराडी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आईवडील आणि शाळेतील क्रीडा शिक्षक विजय चव्हाण, सुधीर राठोड यांना दिले आहे. या निवडीबद्दल पुसद तालुक्यातील सर्व पैलवान मंडळी कडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.पुढील फेरीतील स्पर्धेसाठी त्यांना सर्व शिक्षकांनी शुभेच्छा दिल्या आहे.



