महायुतीचे उमेदवार ॲड.इंद्रनिल नाईक यांनी महाकाली व गणपतीचं दर्शन घेत फोडला प्रचाराचा नारळ!
पुसद मतदारसंघासाठी ॲड इंद्रनील नाईक यांचे स्वतंत्र घोषणापत्र!

पुसद : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. उमेदवारांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. पुसद मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या सोबतच वंचित बहुजन आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार जोमाने कामाला लागली आहे.राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड.इंद्रनिल मनोहरराव नाईक यांनी उमेदवारी दिली आहे.
दि,६ नोव्हेंबर रोजी पुसद शहरातील उदासी वार्डातील महाकाली व गणपती मंदिर येथे त्यांनी पूजा अर्चना केली व आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात करण्यात केली आहे. दरम्यान वाहनांचा ताफा तसेच हजारो कार्यकर्त्यांची गर्दी पाहावयास मिळाली, राष्ट्रवादी पक्षातील अनेक कार्यकर्ते पदाधिकारी सोबत आहेत.
प्रचारासाठी महायुतीचे सर्व घटक पक्ष भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदेगट, राष्ट्रवादी अजित पवार, रिपब्लिकन पार्टी आठवले गट, पिरिपा कवाडे गट, तसेच लहुजी शक्ती सेना,व असंख्य महिला व ज्येष्ठ नागरिक तथा युवक या प्रचार सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित होते. या निवडणुकीत आम्ही त्यांना बहुमताने विजयी करू असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.या प्रचारादरम्यान त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसद मतदारसंघासाठी ॲड.इंद्रनील नाईक यांचे स्वतंत्र घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले.अजित पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचा स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इतकेच नाही तर राज्यातील ५० विधानसभा मतदारसंघासाठी ५० जाहीरनामे पक्षाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अशी कल्पना पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच अंमलात आणली गेली आहे. त्याच अनुषंगाने पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. इंद्रनील नाईक यांनी आज पत्रकार परिषद आयोजित करून स्वतंत्र घोषणापत्र प्रसिद्ध केले आहे.
ज्यामध्ये पुसद विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठीपुढील ५ वर्षांत प्रगतीच्या नव्या शिखरावर घेऊन जावु अशी घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे.यामध्ये १) माळ पठारासाठी लिफ्ट सिंचन आणि पैनगंगा नदीवर बॅरेजेस उभारून सिंचन सुविधा सोप्या करण्याचा आणि माळ पठार परिसरातील पाण्याची पातळी वाढवण्याचा वादा करण्यात आला.२) दुर्गम भागातील युवकांसाठी ग्रामीण आणि वातानुकूलित अध्ययन कक्ष आणि वाचनालय उभारण्याचा व मनोहरराव स्टेडियमच्या क्रीडा संकुलाचे निर्माण तसेच पीएम कौशल्य विकास योजनेअंतर्गत युवकांना कौशल्य प्रशिक्षण देवून रोजगार निर्माण करण्याचा वादा करण्यात आला.३) १००० टन क्षमतेचा सोयाबीन प्लांट आणि मेगा फूड पार्क स्थापन करून स्थानिकांसाठी ५००० प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करण्याचा वादा करण्यात आला.
४) प्रत्येक गटात शेतकरी उत्पादक कंपनी आणि माती परीक्षण केंद्र स्थापन करण्याचा आणि औद्योगिक क्षेत्रात (MIDC) मध्ये दूध डेअरी योजना सुरू करून आणि ग्रामपंचायत स्तरावर संकलन केंद्र स्थापन करीत दुग्ध व्यवसाय क्षेत्रात श्वेतक्रांती आणण्याचाही वादा करण्यात आला.५) औद्योगिक क्षेत्रात ( MIDC) व औद्योगिकीकरणा द्वारे २००० पेक्षा अधिक महिलांना रोजगार मिळवून देण्याचा वादा करण्यात आला.६) पूस नदी घाट निर्माण करून सौंदर्यीकरण करण्याचा मानस व्यक्त केला. तसेच महिलासाठी १०० बेडस्चे अद्यावत सुसज्ज रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे सांगितले.७) पुसद शहरात भूमिगत गटार आणि वीज केबल्सच्या टाकले जातील आणि शहरातील अतिक्रमण समस्येवर उपाययोजना करण्याचा वादा करण्यात आला.८) शहरात सुसज्ज डी.पी. रोड ,ऑक्सिजन पार्क चे निर्माण करून पर्यटक आकर्षित करण्यासाठी मतदारसंघातील पर्यटन स्थळांचा तसेच तीर्थस्थळांचा विकास करण्याचा वादाही करण्यात येईल असे घोषणापत्रात ॲड इंद्रनील नाईक यांचा वाद… घड्याळाला मतदान करुन बांधू विकासाचा नवा धागा..असे घोषणापत्रात प्रसिद्ध करण्यात आले.या दरम्यान महायुतीचे व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे हजारो पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या भागात युवा उमेदवार हवा असा आग्रह सामान्य जनता करू लागली आहे. याचा फायदा ॲड.इंद्रनील नाईक यांना मिळणार असे चित्र सध्या पुसद मतदारसंघात पाहावयास मिळत आहे.