हृदयद्रावक घटना ! श्रीरामपूर येथील युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू!

पुसद : अकोट तालूक्यातील धारगड लगतच्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या सुसाईड पॉईंट जवळ श्रीरामपूर येथील साहिल मनीष राठोड (वय—२५ वर्षे) या शिवभक्ताचा रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी (ता.१९) बुडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.अकोट तालुक्यातील धारगड येथे यात्रेनिमित्त अकोला येथील पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला शिकणारा साहिल मनीष राठोड, त्याचा भाऊ वेद व मित्र धारगड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परत येत असताना पीर बाबा जवळ असलेल्या नदीपात्रामध्ये पोहण्यासाठी बसला होता. एवढ्यात साहीलचा पाय घसरुन तो प्रवाह बरोबर वाहून गेला. तो बुडत असताना दोन-तीन वेळा वरती आला मात्र डोहात पाणी जास्त असल्यामुळे व पोहता येत नसल्याने तो वरती येऊ शकला नाही. अखेर त्याचा डोहात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती आकोट ग्रामीण पोलिसांना कळताच पोलीस स्टेशनचे कर्मचारी व पोपटखेड येथील एकलव्य बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेऊन साहिलचा मृतदेह डोहाच्या बाहेर काढला .साहिलच्या मृतदेहाचे आकोट ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. तो श्रीरामपूर येथील रहिवासी व महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना यवतमाळचे जिल्हाध्यक्ष मनीष राठोड यांचा मुलगा असून मृतकाच्या पश्चात वडील आई भाऊ असा मोठा परिवार आहे.साहिलच्या अचानन जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.साहिलच्या पार्थिवावर मंगळवारी(ता.२०)पुसद येथील हिंदूस्मशान भूमीतील मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला आमदार इंद्रनिल नाईक,यवतमाळ जि.प.चे माजी उपाध्यक्ष सदबाराव मोहटे,माजी सदस्य श्रीराम पवार,दिगंबर जगताप,बाबुसिंग आडे,माजी उपसभापती विजय जाधव,अनुकुल चव्हाण,दयाराम चव्हाण,प्रा.टी.एन.बुब, स.गट विकास अधिकारी संजय राठोड, गटशिक्षणाधिकारी संजय कांबळे,उत्तम चव्हाण,अधिक्षक अमर राठोड, काकडदातीचे सरपंच मयूर राठोड,श्रीरामपूरचे सरपंच आशिष काळबांडे,यांचेसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी,अधिकारी,शिक्षक व नातेवाईक,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध संघटनांच्या वतीने ललित सेता यांनी तर समाजाच्या वतीने मुंगशी येथील सखाराम चव्हाण कारभारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली.