हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार जाहीर; या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याचे प्रतिष्ठानाच्या वतीने आवाहन!

पुसद: हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४६ वा स्मृतिदिन पुसद येथे सोमवारी (ता. १८) बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहतील. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे प्रमुख अतिथी आहेत. राज्यमंत्री इंद्रनील नाईक या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहे.
या कार्यक्रमात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने महाराष्ट्रातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शाल श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. दुपारच्या सत्रात पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचे अनुभव कथन व ‘पोकरा’ टप्पा दोनवर मृदा विज्ञान विशेषज्ज्ञ विजय कोळेकर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदच्या वतीने करण्यात आले आहे.
या सत्कारमूर्ती शेतकऱ्यांची नावे अशी
पश्चिम महाराष्ट्र : विनोद संपतराव तोडकर (कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), जनार्दन संतराम अडसूळ (तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा)
उत्तर महाराष्ट्र : रमाकांत काशिनाथ बागूल (कुसुंबा, ता. जि. धुळे), वंदना प्रभाकर पाटील (पळासखेडा बु., ता. जामनेर, जि. जळगाव).
मराठवाडा : दादासाहेब दौलतराव शिंदे (सिंदोन, पो. आडगाव बु., ता. जि. छत्रपती संभाजीनगर), बालाजी दत्तराव महादवाड (डोंगरगाव, ता. मुदखेड, जि. नांदेड).
कोकण : अनिल हरिश्चंद्र शिगवण (कुंभवे, पो.साखरोळी, ता. दापोली, जि. रत्नागिरी), मिनेश मोहन गाडगीळ (गुळसुंदे, ता. पनवेल, जि. रायगड).
विदर्भ : कुंदन देवरावजी वाघमारे (गीताई नगर, पो. गोपुरी, ता. जि. वर्धा), नरसिंग थावरा जाधव (जवळा, ता. आर्णी, जि. यवतमाळ).
कृषी शास्त्रज्ञ : डॉ. दत्तात्रय साहेबराव थोरवे (वरिष्ठ संशोधन सहायक, मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव, ता. फलटण जि. सातारा)
प्रोत्साहनार्थ : कृषी शास्त्रज्ञ (ए.आय.) प्रा. नीलेश अशोक नलावडे (मुख्य कार्यकारी अधिकारी, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती)
समाज माध्यम शेतकरी मार्गदर्शक : सागर बापूसो कोपर्डेकर (बालिंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर)



