महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन!

पुसद :धमक्रांती प्रज्ञा पर्व २०२३ च्या वतीने सकाळी ठीक ८:०० वाजता किशोर कांबळे व सर्व पदाधिकारी यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच समता सैनिक दलाच्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली. 
यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली….
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून धम्मक्रांती प्रज्ञापर्व २०२३ च्या वतीने ‘एक वही एक पेन’ अभियान राबविले असल्यामुळे बऱ्याच धम्म बांधवांनी अभिवादन म्हणून वह्या पेनी दिल्या.तसेच सायंकाळी ठीक सहा वाजता दर वर्षीप्रमाणे याही वर्षी कॅन्डल मार्च, सोबत एक पेन एक वही सुद्धा घेऊन यावी जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना हातभार लागेल. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना खरे अभिप्रेत असलेले अभिवादन होईल… या कार्यक्रमाला महामानवाला अभिवादन करण्यासाठी धम्म क्रांती प्रज्ञापर्व समिती २०२३ चे सर्व पदाधिकारी समता सैनिक दल,पुसद शहरातील असंख्य नागरिक व महिला आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.



