लाडकी बहीण योजनेची नोंदणी निःशुल्क सरकारची घोषणा तर पुसद तहसील कार्यालयावर लाभार्थ्यांची कागदपत्रांसाठी पैशांची लूट!

पुसद: राज्य सरकारने लाडकी बहिण योजना जाहीर करताच त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ मिळावा यासाठी शहरासह ग्रामिण भागात महिलांची धावपळ सुरु झाली आहे. तहसील सेतु कार्यालयावर मोठ्या रांगा लागल्या आहे. तर एकीकडे या योजनेच्या पात्रतेसाठी लागणारी कागदपत्रे काढण्यासाठी या महिलांची लूट सुरु आहे.तर राज्य सरकारने या योजनेसाठी नोंदणी निःशुल्क केली असून उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल सर्टिफिकेट सक्तीचे केले होते तेही अट आता शिथिल केली आहे. अर्ज नोंदणीसाठी १५ जुलैपर्यंतची मुद्दत दिले होती ती आता ती वाढवून ३१ ऑगस्ट करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात ‘लाडली बहन’ योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली. त्याचीच पुनरावृत्ती करत विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिंदे सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पुसद शहरांसह तालुक्यातील लाभार्थ्याची तहसील कार्यालयावरील सेतू केंद्रांवर महिलांची मोठी झुंबड उडाली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज स्वीकारण्यासाठी मुदत १५ जुलैपर्यंत होती ती आता वाढवण्यात आली आहे. त्यामुळे महिलांनी सेतू केंद्रांसमोर मोठ्या रांगा लावल्या आहेत. त्यामध्ये पत्नीला मदत करण्यासाठी पुरुषाच्याही रांगा आहेत त्याचाच फायदा उचलत तहसील कार्यालयावर काही दलालांनी या लाडक्या बहिणींना लुटण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे.
या योजनेचे कागदपत्रे काढुन देण्याच्या नावाखाली लाभार्थी महिलांकडून ३०० ते ४०० रूपये उकळण्याचा सपाटा सुरू आहे. तर सेतू केंद्रांवर तासंतास रांगेत उभं राहावं लागत असल्यामुळे महिला वैतागल्या आहेत तर एकीकडे काही तलाठी उत्पन्नाच्या अर्जासाठी सुद्धा ५०ते१०० रूपयांची पैशांची मागणी करीत असल्याची सुत्राची माहिती आहे. या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळविण्यासाठी कागदपत्रे काढण्यासाठी महिलांची झुंबड उडाली असून दुसरीकडे स्टॅम्प पेपर, तलाठी कार्यालय, महा-ई- सेवा केंद्रावर महिलांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. महिलांच्या या गर्दीमुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी लागणारे कागदपत्रे मिळवण्याकरिता अडचणी येत असल्याची बाब समोर आली आहे.हे कागदपत्रे काढण्यासाठी मात्र तहसील कार्यालयावरील परीसरात दलाल चांगलेच सक्रिय झाले असून लाभार्थ्यांचे व विध्यार्थ्यांची अर्थीक लुट करीत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तहसील कार्यालयावर सकाळपासून महिलांची गर्दी उसळल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. यामुळे सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांची देखील तारांबळ उडाली आहे.त्यामुळे संबंधित महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट पर्यंत वाढविण्याचा शासनाचा निर्णयाला झाल्याने तसेच नोंदणी निःशुल्क असल्याने लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालांच्या अमीषाला बळी नपडतात सावकाशपणे कागदपत्रे काढुन योजनेचा लाभ घ्यावा जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही.लाडकी बहिण योजनेचा स्थानीक काही नेत्यांनी मात्र सोशल मीडियावर व वृत्तपत्रांतून बातम्या लावून नुसता गवगवा केला पण लाभार्थ्यांसाठी त्यांना एखाद्ये साधं मार्गदर्शक केन्द्र सुद्धा सुरू करता येईना… हे मात्र शोकांतिका आहे. 



