घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची सुरू असलेली लूट थांबविण्यास प्रभारी गटविकास अधिकारी हतबल!
पुसद पंचायत समितीला कायमस्वरूपी गटविकास अधिकारी देण्याची मागणी!

पुसद : पंचायत समिती अंतर्गत सुरु असलेला सावळा गोंधळ उघडकीस आला आहे घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरकुलाच्या नावाखाली गृहनिर्माण अभियंत्याकडुन लाभार्थ्यांची लुट सुरू असल्याची खुद ग्रामपंचायतीच्या सचिवांनेच स्थानिक आमदार तथा राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील भाऊ नाईक व पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे तर या हप्त्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांकडुन हजारो रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप लाभार्थ्यांनी केला आहे.पुसद तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत १२० ग्रामपंचायती असून एकूण १७८ गावे आहेत.तर ६९ ग्रामसेवक व १४ ग्रामविकास अधिकारी असे एकूण ८३ पदे आहेत. मंजूर पदापैकी अनेक रिक्त पदे आहेत.तर ग्रामविकास अधिकारी व सचिवांकडे एकापेक्षा अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार दिलेला आहे.मात्र या पंचायत समितीचे गटविकास अधिकारीही सुद्धा प्रभारावर असल्यामुळे या विभागाचा संपूर्ण कारभार ढेपाळला आहे. त्यामुळे पुसद पंचायत समितीतील प्रभारी गटविकास अधिकारी यांची तात्काळ इतरत्र बदली करून कायमस्वरूपी उच्चश्रेणी गटविकास अधिकारी देण्याची मागणी नागरिकाकडून जोरधरू लागली आहे. सध्या पुसद पंचायत समितीच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत अनेक योजना राबविल्या जात आहे. त्यामध्ये १५ वित्त आयोगाच्या योजनेतून विविध कामे दलित वस्ती योजनेतून सिमेंट काँक्रेट रस्ते, बंदिस्त नाल्या गटारी घरकुल अशा विविध योजना या सर्व सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होण्याच्या हेतूने शासनाच्या वतीने राबविल्या जात आहे त्यामध्ये २०२३ ते २०२५ या आर्थिक वर्षात शासनाची महत्त्वकांक्षी असलेली घरकुल योजना सर्वसामान्यांच्या खूपच उपयोगाची ठरत आहे. परंतु या पंचायत समितीचा कारभार पूर्णपणे प्रभावर असल्यामुळे तसेच राजकारणाच्या वरदहस्त असल्यामुळे संबंधित प्रभारी गट विकास अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्यामुळे या पंचायत समितीचा कारभार संपूर्णपणे ढेपाळला आहे. पंचायत समितीच्या हद्दीतील अनेक ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या घरकुलासाठी लाभार्थ्याची सर्रासपणे लूट सुरू आहे तशी अनेक तक्रारी व खुद्द ग्रामपंचायतचे सचिव तसेच नागरिकांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केल्या असल्या तरीही संबंधित प्रभारी गटविकास अधिकारी हे संबंधित गृहनिर्माण अभियात्यांना स्व स्वार्थातून पाठीशी घालत आहेत.तर या संदर्भात वरिष्ठाकडे तक्रार करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना अपुरे मनुष्यबळ असल्याचे कारण सांगून भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजनेच्या लाभार्थ्याची सर्रासपणे लूट सुरू आहे. हेच ते प्रभारी गटविकास अधिकारी आहेत जे आपल्याच अधिनस्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची सुद्धा दखल घेत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत असून हे गट विकास अधिकारी सर्वसामान्य नागरिकांना काय.? न्याय देणार याची मात्र अपेक्षा नकेलेली बरी त्यामुळे संबंधित प्रभारी गटविकास अधिकारी यांनी १ डिसेंबर २०२२ पासून प्रभार स्वीकारला त्या काळापासून आज पर्यंतच्या त्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व कामाची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.ग्रामीण भागातील गोरगरिबांना कच्च्या घरातून पक्क्या घरात नेण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जात आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना १ लाख २० हजार रुपये अनुदान दिले जाते.परंतु, महागाईमुळे घर बांधण्यासाठी आधीच शासनाने दिलेले अनुदान अपुरे पडत आहे. एवढ्यात घरे बांधायची कशी? असा प्रश्न लाभार्थ्यांना पुढे निर्माण झाला आहे.बांधकाम साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत. वाळू, सिमेंट, विटा, लोखंडी सळया, सिमेंट पत्रे, दारे, खिडक्या, फरशी आणि इतर साहित्याचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. मजुराचे दर देखील वाढलेले आहेत. त्यातच ग्रामीण गृहनिर्माण अभियंता कडून तसेच संबंधित प्रशासनाकडून पैशाची मागणी केली जात आहे त्यामुळे घरकुल लाभार्थी मेटाकुटीला आले आहे. तर तक्रार करूनही तक्रारीची आपल्याच कर्मचाऱ्याकडून तक्रार करून सुद्धा शहानिशा न करता संबंधित प्रशासनातील प्रभारी गटविकास अधिकारी धृतराष्ट्राचे सोंग घेऊन बसले आहेत त्यामुळे वरिष्ठ स्तरावरून सबंधित गटविकास अधिकाऱ्यांसह गृहनिर्माण अभियंत्याची त्रिसदस्य समिती स्थापन करून सखोल चौकशी करून कारवाई करावी तसेच संबंधित प्रभारी गटविकास अधिकारी यांचा प्रभाव काढून त्यांची तात्काळ इतरत्र बदली करावी तसेच या पंचायत समितीला कायमस्वरूपी उच्चश्रेणी गटविकास अधिकारी देण्यात यावा व संबंधित गृहनिर्माण अभियंत्यावर घरकुलासाठी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी केल्याप्रकरणी याची सेवा समाप्त करुन त्यांना कार्यमुक्त करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी करण्यात येत आहे.



