क्राइम

गोवंश मांसाची वाहतूक करणाऱ्यावर पुसद शहर पोलीसांची मोठी कारवाई!

पुसद : राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू होऊनही गोमांसाची वाहतूक आणि विक्री केली जात आहे.पुसद शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे आज त्यांच्या स्टाफसह आषाढी एकादशी निमित्त बंदोबस्तात असल्याने शहरात पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे सकाळी ८:३० वाढदिवसाच्या सुमारास त्यांना गोपींनिय माहिती मिळाली की एक इसम ऑटोमधुन शेकडो किलो गोवंश-मांसाची अवैद्य वाहतूक करीत आहे. त्यावेळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन शासनाने प्रतिबंधित केलेला गोवंश-मास पोलीसांनी ताब्यात घेतले असून ऑटो वाहनामधिल १२०कीलो गोवंश- मांस असा एकुण १,८२,५००रुपया मुद्देमाल जप्त करण्यात आले असून पुसद शहर पोलीसांनी गोवंश- मांसाची वाहतुक करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे.याबाबत शहर पोलीसांनी झेप न्यूजला दिलेली माहिती अशी की,आज दि,६जुलै २०२५ रोजी पुसद शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे हे त्यांचे पोलीस स्टाफ पो.हे. कॉ. संतोष आढाव, ब.नं. २१९९, पो.हे. कॉ. अभिमन्यु चव्हा, ब.नं. ४९७, पो.हे.कॉ. मंदाकीनी भगत. ब.नं.७५८. पो.हे.कॉ. मनोज कदम, ब.नं. १४६३. पो.ना. दिनेश सोळंके.ब.नं. २२८५, पो.कॉ. आकाश बाभुळकर, ब.नं.२०३८ यांचे सह आषाढी बंदोबस्त निमीत्ताने शहरात पेट्रोलींग करीत असतांना सकाळी अंदाजे ८.३० वाजण्याच्या सुमारास त्यांना गोपनिय माहीती मिळाली की, एक ईसम हा त्याचे ऑटो क्रमांक एम एच-२६-टिसी- ०४१६ चालक सैय्यद सालार सैय्यद रज्जाक, वय- ५६ वर्षे, रा. गढीवार्ड पुसद हा त्याचे ऑटोमध्ये शासनाने प्रतिबंधीत केलेले गोवंस-मांस वाहतुक करुन घेवुन जाणार आहे. त्या माहिती वरुन सदर ऑटो व वाहन चालकास ऑटोच्या मधल्या शिटच्या गाल्यामध्ये नायलॉन पोत्याची फारीमध्ये गुंडाळून ठेवले गोवंश-मांस झाकुन ठेवून वाहतुक करतांना पकडले. सदरचे गोवंस-मांस हे मुहम्मद अतिक मुहम्मद अकील कुरेशी, वय अं-३० वर्षे, रा. उर्दू स्कूल नेहरुन वार्ड पुसद याचे सांगणेवरुन लोहार लाईन पुसद येथे घेवुन जात असल्याचे ऑटोचालकाने सांगीतले. पंचासमक्ष मुद्देमालासह आरोपीस ताब्यात घेवुन पुसद शहर पोलिस स्टेशन येथे आणले व सुशिल शंकर चव्हाण, पशुवैद्यकीय अधिकारी, लघु पशु चिकिस्तालय पुसद यांनी गोंवश -मांसाची तपासणी केली असता सदर मांस हे गोवंशाचे असल्याचे प्रथमदर्शनी सांगीतले व सदर मासांचे संम्पल घेण्यात आले आहे. आरोपीचा ऑटो बजाज कंपनीचा किंमत अंदाजे १,५०,०००/- रुपये, ऑटोमधील गोवंश मांस वजन अंदाजे १२० कि.ग्रॅ. कि.अं. २४,०००/- रुपये, एक ईलेक्ट्रॉनीक वजन काटा किंमत अंदाजे १,५०० रुपये, एक लोखंडी सुरा किंमत अंदाजे ००.०० रुपये, ऑटो चालक याचा मोबाईल किं.अं. ७,०००/-  रुपये, असा एकुण १,८२,५००/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे व आरोपों विरुध्द अप.क्र. ४१६/२०२५, कलम-५, ५ (क), ९, ९ (अ) महाराष्ट्र प्राणीरक्षण अधिनियम १९७६ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मा. अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, हनुमंत गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद यांचे मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांचे नेतृत्वात त्यांचे अधिनस्त पोलीस पथकाने केली असुन गुन्हाचा अधिक तपास स.पो.नि. प्रेमकुमार केदार हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close