हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांची ११०वी जयंती उत्साहात साजरी!

पुसद:हरितक्रांतीचे प्रणेते, भूमिपुत्र, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या ११०वी जयंतीचा कार्यक्रम वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसद यांनी वसंतराव नाईक चौकामध्ये आयोजित केला होता.सर्वप्रथम ययाती नाईक, माजी उपाध्यक्ष, जिल्हा परिषद यवतमाळ यांनी वसंतराव नाईक यांचे पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.
तदनंतर वसंतराव नाईक यांचे प्रतिमेस माजी मंत्री मा. डॉ. एन.पी. हिराणी, माजी आमदार विजयराव पाटील
चोंढीकर, प्रतिष्ठानचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. गोविंद फुके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृषीभूषण दीपक आसेगावकर,
उपाध्यक्ष धनंजय सोनी, सचिव डॉ. उत्तम रुद्रवार, प्रतिष्ठानचे कार्यकारणी सदस्य विजय जाधव, सिराज हिराणी, यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
याप्रसंगी सौ. मोहिनीताई इंद्रनिल नाईक, मुख्याधिकारी अभिजीत वायकोस, माजी नगराध्यक्ष सौ. जाईताई भागवत, माजी नगराध्यक्ष सौ. माधवीताई गुल्हाने, जिनिंग प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष विजयराव चव्हाण, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदबाराव मोहटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री अमोल फुके, माजी जिल्हा परिषद सदस्य बि.जी.राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री रतिराव राऊत, सौ. जयश्री राठोड, माजी डी. वाय. एस. पी. श्री दयाराम चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष क्रांती कामारकर पाटील, ज्येष्ठ नेते वसंतराव पाटील कान्हेकर, जिल्हा परिषद सहकारी बँकेचे विभागीय अध्यक्ष अनुकूल चव्हाण, माजी नगरसेवक मुरलीधर जाधव, पत्रकार प्रा. दिनकर गुल्हाने, पत्रकार मारोती भस्मे, पत्रकार के.जी. चव्हाण, पत्रकार गणेश राठोड, कार्यकारी प्राचार्य डॉ.सौ. वंदना वानखेडे, माजी प्राचार्य डॉ. गणेश पाटील, प्रा. सौ. साधना हरणे, ग्रंथपाल.
सौ छायाताई जत्तकर, याडीकार पंजाबराव चव्हाण, प्रमोद हरणे, माजी तहसीलदार अशोक गीते, डॉ. केशव चेटुले, प्राचार्य के. बी. राठोड, बन्सी चव्हाण, दिलीप गुप्ता, श्याम जाधव, श्रीराम आडे, संतोषराव देशमुख, माजी प्राचार्य नानासाहेब ताटेवार, प्रा. संजय चव्हाण, पद्माकर कोडापे, मुख्याध्यापक गजानन चिंतावार, अरुण येरावार, डॉ.नानवाला, प्रा. विजय राठोड, पृथ्वीराज चव्हाण आदी मान्यवर कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे कार्यालय प्रमुख उत्तमराव जाधव यांनी केले.



