लोकमान्य गणेश मंडळ गांधीनगर,पुसद यांच्या वतीने प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी यांचा सत्कार

पुसद :शहरांमधील गांधीनगर भागामधील असलेल्या लोकमान्य गणेश मंडळ,घाटे ले आउट यांच्या दि.१५ सप्टेंबर २०२४ रोजी महाआरती व महाप्रसाद चे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी महाआरतीचे यजमान श्री.शरदभाऊ मैंद,अध्यक्ष,पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह सहकारी बँक लिमिटेड पुसद व माजी नगरसेवक श्री.नीरजभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आली.याप्रसंगी मान्यवरचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन मंडळ यांच्या वतीने करण्यात आला.तसेच घाटे ले आऊट,गांधीनगर मधील रहिवाशी व फुलसिंग नाईक महाविद्यालय, पुसद येथे पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात कार्यरत तथा श्रीमती वत्सलाबाई नाईक महीला महाविद्यालय, पुसद येथे समाजशास्त्र विभागात प्र.विभाग प्रमुख म्हणून प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी यांना नुकतीच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती यांच्या कडून मानव विज्ञान शाखेतील समाजशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केल्याबद्दल लोकमान्य गणेश मंडळ, घाटे ले आऊट गांधी नगर पुसद यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सदर सत्कार कार्यक्रम मा.श्री.शरदभाऊ मैंद,अध्यक्ष,पुसद अर्बन को ऑपरेटिव्ह सहकारी बँक लिमिटेड पुसद व माजी नगरसेवक श्री.नीरजभाऊ पवार यांची उपस्थितीत घेण्यात आला. या प्रसंगी घाटे ले आउट मधील सर्व महिला मंडळ तसेच सर्व नागरिक व भाविक भक्त उपस्थित राहून अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचाली करीता.शुभेच्छा दिल्या.त्याबद्दल डॉ.सौ.अनुश्री अनिल पुरी यांनी सर्वांचे आभार व्यक्त करून धन्यवाद मानले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता लोकमान्य गणेश मंडळचे अध्यक्ष.श्री.अभिजित भीमराव शिंदे, उपाध्यक्ष चेतन किशोर खारकर,सचिव, अष्टविनायक बालाजी लांडे, कोषाध्यक्ष शैलेश नामदेव राठोड,सदस्य,गोपाल चव्हाण, समाधान चव्हाण,महेश शिंदे,देव रायपूरकर,आशिष जाधव, स्वप्निल भाकरे, सौरभ चेटुले,तुषार शिरभिडे,विशाल चव्हाण, कन्हैया चव्हाण यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.सदर बातमी आपल्या लोकप्रिय दैनिक मधून प्रसिद्ध करावी हि नम्र विनंती



