चिकनी येथील शेतकऱ्याने कर्जापायी मरणाला कवटाळले!

पुसद: तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजा चिकणी येथील शेत शिवारात अल्पभूधारक शेतकऱ्यांने सततची नापिकी, कर्जाचा वाढता डोंगर आदी कारणांमुळे हतबल झालेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याने कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.३० ऑगस्ट २०२३ रोजी सुमारे ४:०० ते ४:४५ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
गणेश रामा गवळी वय (४८)वर्ष असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्याग्रस्त व्यक्तीच्या नातेवाईकांनी दि.३०ऑगस्ट २०२३दिलेल्या जबानी रिपोर्ट वरून नामे संभा रामा गवळी मागीय वय५२ वर्ष व्यवसाय मजुरी रा.चिकणी ता.पुसद महाविरनग पुसद समक्ष माझा मेहुणा नामें औकार नारायण मोरे रा.सांवगी ता.पुसद यांनी पोलीस स्टेशनला हजर राहून जबानी रिपोर्ट देत मला एक लहान भाऊ नामे गणेश रामा गवळी व दोन बहिणी असुन आमचे सर्वांचे लग्न झाले आहे. आमच्या नावाने समाईक मिळुन ५ एकर शेती आहे सर्वे नंबर २/२,२१३ असून अशी सर्व शेती माझा लहान भाऊ गणेश रामा गवळी हाच शेती करत होता दि३० ऑगस्ट२०२३ रोजी सकाळी १०:००या ला मी बजाज ड्रेसेस पुसद येथील कापड दुकाणापर काम करण्यासाठी गेलो असतांना सकाळी ६:०४ वाजण्याच्या सुमारास गावातील व्यक्तीने.य मोबाईलवर फोन करून तुमच्या शेतामध्ये तुमच्या भावने कडुलिंबाच्या झाडाला फाशी घेतली आहे असे सांगीतले तेव्हाच मोटार सायकलने शेतात गेलो ह भाऊ गणेश रामा गवळी हा खाली पडुन होता त्यावेळेस तेथे हजर असलेली माझे भावाची पत्नी शारदा गणेश गवळी यांना विचारफुस केली असता आम्ही दोघेही सकाळी१०:०० वाजल्यापासून शेतावर निंदन करीत होतो मी व पती असे आम्ही दोघेजन घरी आलो व घरी चाय पिवु पती गणेश हे शेतात अं ३:०० बातम्या सुमारास शेतात निघून गेले त्यानंतर ४:३० वाजण्याचा सुमारास गाईचे दूध काढण्यासाठी त्यांना पाहत होती उसाच्या शेतामध्ये असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले म्हणून मी पती गणेश यांचे विळ्याने दोरी तोडली तरी माझा लहान भाऊ गणेश रामा गवळी वय ४८ वर्ष यांनी सततची नापीकी व बैंकेच्या कर्जापायी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे महिती ग्रामीण पोलीस स्टेशनला देण्यात आली त्यावरून पोलिसांनी पंचनामा करून सदर मृतदेह नातेवाईकाच्या शॉपिंग करण्यात आला.सदर अधिक तपास ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहेत . अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत मौजा चिकनी येथील शेत सर्वे नं.२१३ दक्षेत्र२.०४ हेआर क्षेत्र असून शेत जमीनीवर भारतीय स्टेट बैक ऑफ इंडीया कर्ज घेऊन त्यांनी आपल्या एका मुलीचे लग्न उरकले. गेली काही वर्षे सततची नापिकी झाली. त्यामुळे डोक्यावर झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत गणेश गवळी यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक विवाहित मुलगी असा परिवार आहे. या शेतकऱ्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



