अभियंता सय्यद अन्वर अली यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कर्करोग ग्रस्त रुग्णाला केली मदत

पुसद: अलिकडच्या काळात वाढदिवस साजरा करणे हा मोठा इव्हेंट झाला आहे. वाढदिवसासाठी मोठा खर्च केला जातो. परंतु पुसद येथील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष अभियंता सय्यद अन्वर अली यांनी रोटरी क्लब येथे ठरलेला कार्यक्रम रद्द करून आपली सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा खर्च टाळून कर्करोगग्रस्त पत्रकार दिनेश खांडेकर यांच्या उपचाराकरिता २१ हजारांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद येथील महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अभियंता सय्यद अन्वर अली यांचा आज वाढदिवस होता. मित्रमंडळीच्या आग्रहावरुन हा वाढदिवस ठरल्याप्रमाणे रोटरी क्लब येथे साजरा करण्यात येणारे होता. परंतु त्यांना माहिती मिळाली की आपल्या येथील पत्रकार दिनेश खांडेकर हे कर्करोगाने त्रस्त असल्याने त्यांनी ठरलेला कार्यक्रम रद्द करून आपली सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा खर्च टाळून कर्करोगग्रस्त पत्रकार दिनेश खांडेकर यांच्या पुढील उपचाराकरिता २१ हजारांचा धनादेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात व मान्यवरांच्या उपस्थित
प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी शहरातील दानशूर नागरिकांनी कर्कग्रस्त रुग्णास आपली सामाजिक बांधिलकी जपत सढळ हाताने मदत करावी असे आव्हान केले. हा धनादेश कर्करोग ग्रस्ताचे मित्र लक्ष्मण कांबळे यांना सुपूर्त करताना पुसद सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्या कु. प्रिया पुजारी उपविभागीय अभियंता उमाकांत कांबळे, शासकीय कंत्राटदार पि.के . जाधव,राजू आसेगावकर,अजिज खतीब,नव्हे खाॅन,आसिफ शेख, अमोल खडगी, पत्रकार ललितभाऊ सेता, लक्ष्मण कांबळे, बाबाराव उबाळे, प्रदीप नरवाडे, मारोती भस्मे,प्रकाश खिल्लारे, शं.का. माहुरे, मनीष दशरथकर,विजय निखाते, कुलदीप सुरोशे, ज्ञानेश्वर मेटकर,मारोती कांबळे,तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी व पत्रकार बांधव उपस्थित होते..अशावेळी अभियंता अन्वर अली यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपत एक आदर्श निर्माण केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.



