राष्ट्रीय बंजारा परिषद च्या विदर्भ कार्याध्यक्ष पदी संजय मदन आडे यांची निवड

दिग्रस/प्रतिनिधी:धर्मपिठ भक्तिधाम पोहरादेवी येथे महंत जितेंद्र महाराज यांच्या ऊपस्थीतीत भारतातील सर्वात मोठी संघटना राष्ट्रीय बंजारा परिषदेचे नवनीर्वाचीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.विलासभाऊ राठोड यांनी गोरबंजारा समाजाचे कुशल व्यक्तिमत्व व तळागाळातील भटक्या तसेच वंचित लोकांच्या हक्कासाठी सतत उपोषण, आंदोलन,मोर्चे करून शेतकरी, शेतमजूर, शोषित वंचिताना न्याय मिळवून देणारे श्री.*संजयभाऊ मदन आडे* (हिवळनी)यांची राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या विदर्भ कार्याध्यक्ष पदी नीयुक्तिपत्र देऊन नीवड करण्यात आली आहे व याकरीता समाजमाध्यमातुन संजयभाऊ आडे यांना शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.नीवड प्रक्रिया दरम्यान श्री.वसंतराव राठोड(रा.बं.प.राज्य संघटक),किसनभाऊ जाधव,सिंगदकर(रा.बं.प.राज्य संघटक),श्याम राठोड (राज्य संघटक),विष्णु आडे(राज्य संघटक),श्री.श्यामभाऊ राठोड(वाशिम जील्हाध्यक्ष,रा.बं.प),श्री.रूपेशभाऊ जाधव,श्री.बाळुभाऊ राठोड,श्री.सुनील राठोड,श्री.रामराव राठोड,श्री.शुभाषभाऊ राठोड व ईतर पदाधीकारी व कार्यकर्ते ऊपस्थीत होते.



