शैक्षणिक

एकलव्य इन्फोरमॅटिक्स पुसदच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त सामान्य ज्ञान स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण!

पुसद: येथील एकलव्य इन्फोरमॅटिक्सच्या वतीने दि. १७ जानेवारी ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी तसेच विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती.

या स्पर्धेमध्ये तालुक्यातील व शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सामान्य ज्ञान स्पर्धेत उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमाणपत्र, ट्रॉफी व बक्षीस वितरण करण्यात आले आहे.

पुसद शहरातील एकलव्य इन्फोरमॅटिक्स संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी तसेच विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढावे व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने वर्ग ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या सामान्य ज्ञान स्पर्धेमध्ये शहरातील ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल पुसद, गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपूर पुसद व तालुक्यातील श्री शिवाजी विद्यालय भोजला, स्व.दत्तरावजी पांडे विद्यालय सांडवा, मुंगसाजी आदिवासी आश्रम शाळा माणिकडोह या शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

या सामान्य ज्ञान स्पर्धेत उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्योतिर्गमय इंग्लिश स्कूल पुसद येथील प्रथम क्रमांक तनिशा भागवज, द्वितीय क्रमांक अक्षरा भवाळे, तृतीय क्रमांक दिपक सुभेदार, गुणवंतराव देशमुख विद्यालय कवडीपूर पुसद येथील प्रथम क्रमांक करुणा भगत, द्वितीय क्रमांक राहुल राठोड, तृतीय क्रमांक रोहित खंदारे, श्री शिवाजी विद्यालय भोजला येथील प्रथम क्रमांक पृथ्वीराज ठाकरे, द्वितीय क्रमांक प्रेरणा दामोदरे, तृतीय क्रमांक ऋषिकेश पवार, स्व.दत्तरावजी पांडे विद्यालय सांडवा येथील प्रथम क्रमांक शालु राठोड, द्वितीय क्रमांक खुशी चव्हाण, तृतीय क्रमांक अक्षरा वाळके, व मुंगसाजी आदिवासी आश्रम शाळा माणिकडोह येथील प्रथम क्रमांक करण मिरासे, द्वितीय क्रमांक सोहन खंदारे, तृतीय क्रमांक ओमकार माळकर, या विजेत्या विद्यार्थ्यांना एकलव्य इन्फोरमॅटिक्स संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र, ट्रॉफी व बक्षीस वितरण करुन गुण गौरव करण्यात आले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संचालक गुरु शंकर माहुरे, संस्थेचे कर्मचारी स्‍वप्नील माहुरे, ऋषिकेश राठोड, गजानन जाधव, पोर्णिमा माहुरे, नियोजन विभागाचे श्रेयश तळोकार, ऋतुजा हिंगमिरे, भाविका गादेकर, विपणन विभागाचे कुणाल कांबळे, मानसी चव्हाण, महेंद्र मनवर, कार्यालयीन सहाय्यक विभागाचे विक्की राऊत, अजय वानखेडे, संगणक प्रयोगशाळा विभागाचे कोमल ठेंगे, जयश्री खोकले, अक्षय पतंगे, अभिषेक फाळके, व आशिष चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close