दुचाकीला बोलेरो पिकअप वाहनांची जबर धडक; पती जागीच ठार तर पत्नी व नातू जखमी!

पुसद: तालुक्यातील काटखेडा फाट्याजवळ दुचाकीला बोलेरो या पिकअप वाहनाने जबर धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर या अपघातात दुचाकी स्वराची पत्नी व ९ वर्षाचा नातू गंभीर जखमी झाले असून त्यांना पुसद येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. परंतु या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने पंचकोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील महागाव तालुक्यातील सेवादास नगर वडद येथील रहिवासी असलेले अरुण तारा आडे (अं.वय ५५वर्षे ) हे आपल्या स्कुटी क्रमांक एम एच २९ बीआर ४३८९ दुचाकीवरून पत्नी लिलाबाई अरुण आडे (वय५० वर्षे ), व नातु प्रसिद्ध गुरुदत्त आडे(वय९ वर्षे ), हे दि.४ फेब्रुवारी २०२५ रोजी काटखेडा फाटा मार्ग पुसद तालुक्यातील येरंडा येथे नवसाच्या कार्यक्रमावर जाण्यासाठी निघाले होते त्यावेळी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास महागाव वरून पुसदकडे केळी भरून येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहन क्रमांक एम एच ३७टि३४२५ या वाहनाने काटखेडा फाट्याजवळ जवळ धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुचाकीस्वराची पत्नी व नातू गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे तर बोलोरो पिकअप हा धडक देऊन कसा झाला होता परंतु सदर पिकअप पी एन कॉलेज जवळ पकडण्यात आला दारव्हा येथील रहिवासी असलेल्या चालकाला ताब्यात घेण्यात आली आहे.सदर अपघात झाल्याची माहिती ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत व वाहतूक उपशाखेच्या पथकाला मिळाली असता त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून जमलेल्या लोकांना बाजूला करीत वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. त्यानंतर जखमींना येथील रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते.तर अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकी स्वरास शवविच्छेदन करण्यासाठी उपजिल्हा शासकीय रुग्णालय पुसद येथे दाखल केले. असून शिवविच्छदना नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.परंतु या अपघातात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागल्याने पंचकोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.वृत्तलिहेपर्यंत बोलोरो पिकअप चालकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.