ईतर
घराला लागली आग! साहित्य जळून खाक, चार ते पाच लाखांचे नुकसान

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : तालुक्यातील कायर येथे शंकर कोरांगे यांच्या घराला दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान भीषण आग लागून घर जळाल्याची धक्कादायक घटना आज घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीने रौद्ररूप धारण करत पेट घेतला.
या भीषण आगीत घर जळले. अचानक काही नागरिकांना घरामधून धूर निघताना दिसला. त्यावेळीं इतरत्र आरडाओरडा चालू झाली. लगेच गावकऱ्यांनी धाव घेऊन आग विजवण्यास सुरुवात केले. परंतु बराचसा घराचा भाग आगीचा घेऱ्यात सापडला व दुपारची वेळ असल्यामुळे इतरत्र हवा चालू होती त्यामुळे आग मोठ्या प्रमाणात पेट घेत होती. अग्निशमन दल दाखल झाले, आग विझविण्यात आली. या आगीमध्ये जवळपास चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.