पुसद नगर परिषदेच्या निवडणूकीचे खरे ‘धुरंधरनायक” डॉ मोहम्मद नदिम ; हा जनशक्तीचा नव्हे , तर धनशक्तीचा विजय! – शेतकरी नेते मनीष जाधव

पुसद : नगर परिषदेचा निकाल घोषित झाले या निवडणुकीच्या निकालाची उत्कंठता संपूर्ण जिल्ह्यांसह मतदारसंघाला लागून लागली होती अनेक कयास राजकीय विश्लेषकांकडून लावले जात होते अखेर याला पूर्णविराम या अनपेक्षित निकालाने मिळाला आहे.ही निवडणूक प्रस्थापित राजकीय व्यवस्थेला अत्यंत प्रतिष्ठेची म्हणून लढावी लागली व अल्पमताचा जनाधार घेऊन निसटता विजय मिळवून जनमताचा कौल घेऊन मुसंडी मारली कारण संपूर्ण भविष्याच्या गर्तेतील उदयास येणारे राजकीय समीकरण याच निवडणुकीवर अवलंबून होते पुसदकरांच्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयावर कधीकाळी अधिराज्य गाजवणाऱ्या नाईक परिवाराच्या आत्ताच्या या पिढीतील आपसी मनभेद , मतभेदामुळे या बालेकिल्ल्यावर देखील त्यांचा प्रभाव कायम ठेवता आला नाही ही मात्र शोकांतिका आहे. विकास व प्रगतीच्या नावावर बकाल ओसाड पडलेल्या पुसद शहरांसह मतदारसंघाचा न झालेल्या सर्वांगीण विकास अतिक्रमाणाच्या विळख्यात सापडलेल्या शहराचा श्वास गुदमरतोय , पुसद बस स्थानकाची दुरावस्था, भाजी मंडई, कृषी उत्पन्न बाजार समितीची झालेली दुरावस्था, येथील सहकार क्षेत्राला लागलेली घरघर, औद्योगिक क्षेत्राची उतरती कळा, शहरा अंतर्गत रस्ते विकास , नगरपरिषदेच्या शाळा, आरोग्य व्यवस्था व ढिसाळ झालेले प्रशासन , वाढलेलं अतिक्रमण , लोकार्पणाच्या प्रतीक्षेत वनवास सोसत असलेला शेतकऱ्यांच्या आराध्य दैवत वसंतराव नाईक साहेबांचा पूर्णाकृती पुतळा नगरपरिषदेच्या निवडणुका नेत्यांना मोठे करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या हक्क , अधिकाराच्या असतात पण त्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करून राजहट्ट घेऊन आपली दावेदारी करणे या अशा एक नव्हे तर अनेक कारणाने नाईक परिवाराचा प्रभाव या पुसद विधानसभा मतदारसंघात ओसरलेला दिसतोय व कायम टिकवून ठेवता आला नाही अशी जनमानसात चर्चा आहे मात्र या निवडणुकीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी काही ठेकेदारांना हाताशी धरून प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागली आपलं राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी ही अस्मितेची लढाई समजून पूर्ण प्रतिष्ठा पणाला लावली मतदात्यांसाठी पैशाची अतिवृष्टी झाल्याची जोरदार चर्चा शहरात होती अशा या द्रव्यरूपी मूल्यांचा या निवडणुकीत बलस्थानाचा वापर केल्या गेल्याचीही चर्चाा आहे.गेली ७५ वर्षापासून सत्ता केंद्रस्थानी व मतदार संघावर राजकीय प्राबल्य असतानाही एवढा पराकोटीचा संघर्ष करावा लागला हे विशेष….. सत्तेत विद्यमान राज्य मंत्री ६ विभागाच्या खात्याचे मंत्रीपद भोगत असलेल्या इंद्रनील नाईकांच जिल्ह्यात किती? नगरपरिषदांवर यश संपादन करता आलं काय ताकद हा देखील संशोधनाचा व मूल्यमापनाचा विषय आहे यावरून त्यांचा राजकीय सामर्थ्य काय याचा अवलोकन हे दृष्टिक्षेपात येत आहे.स्व पक्षातील कार्यकर्त्यांचा विद्रोह , बंड समविण्यात आलेलं अपयश याचेही चिंतन होणे गरजेचे आहे. उलट पक्षी व्यवस्था परिवर्तनाच्या बाजूने कायम लढा देणारे शोषित , पीडितांचा , श्रमजीवी , वंचित उपेक्षित कष्टकरी घटकांचा बुलंद आवाज असलेला अल्पसंख्यांक समाजातील कुठलाही राजकीय वारसा नसताना महाविकास आघाडीच्या सहकारी घटक घटक पक्षातील काँग्रेसचे नेते डॉ मोहम्मद नदीम यांनी सत्ताधाऱ्यांशी एकाकी कडवी झुंज दिली प्रस्थापित सत्ताधारी व्यवस्थेशी अत्यंत प्रतिष्ठेची लढत दिली अल्पमताने त्यांच पराभव झाला विरोधी पक्ष व विरोधकात नसलेला समन्वय व संवाद हा एक पराभवाचा मुख्य कारण मानल्या जात आहे. आपलाच वाद आपल्याशी म्हणत स्वकीययांनी केलेला विश्वासघात मात्र एक सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढवय्या राजकीय नेता म्हणून या जिल्ह्यात ज्यांची एक स्वतंत्र ओळख निर्माण असून या निवडणुकीत “धुरंदर नायक” ठरले ते म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ मोहम्मद नदीम..
असो या विजयाच्या जल्लोषात व गुलालाच्या राजकीय रणधुमाळी मध्ये आता तरी किमान पुसद शहराचा सर्वांगीण विधायक व रचनात्मक विकास व्हाव मतदात्यांनी पुसदकर म्हणून ओंजळीत टाकलेल्या मताच्या जोगव्यांचा योग्य तो परिणाम पुसद करांना मिळावा स्वराज्याची पंढरी असलेल्या या पुसदला गतवैभव प्राप्त व्हावं यासाठी विरोधी बाकावर बसलेल्या विरोधकांनी देखील आपल्या जबाबदारीचे भान ठेवावे व पुसदकरांनी देखील नेतृत्वाला वेळोवेळी प्रश्न करून विकासाबद्दल जॉब विचारत राहावे हीच एक माफक अपेक्षा आता निवडणूक संपली एकमेकाबद्दल आपुलकी व सहानुभूती ठेवून पुसदच्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येथील अशी अपेक्षा आहे. परंतु या निवडणुकीचे खरे धुरंधर नायक म्हणून येणाऱ्या काळात डॉ. मोहम्मद नदीम यांच्याकडेच पाहिल्या जाईल हे मात्र सूर्यप्रकाशा एवढे सत्य आहे. परंतु या सर्व निवडणुकीत जनशक्तीचा नव्हे धनशक्तीचा विजय झालेला आहे पराभव मात्र हा निश्चित लोकशाहीच्या नैतिक मूल्याचा झालेला आहे.



