जिल्हा ग्रंथालय अधिकारी कविता महाजन यांचा ग्रंथालय संघ व ग्रंथालय महासंघातर्फे सत्कार!

यवतमाळ/प्रतिनिधी (संदीप कदम):-यवतमाळ जिल्हा ग्रंथालय अधिकारी पदी नुकत्याच ३० जूनला रुजू झालेल्या कर्तव्यदक्ष कामकाजासाठी प्रसिद्ध असलेल्या कविता महाजन यांचा यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब व ग्रंथालय महासंघाचे संजय कोल्हे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यादी प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणूनआशिष ढोक यांनी काम पाहत होते.
त्यांच्या ऐवजी आता कविता महाजन रुजू झाल्या यावेळी यवतमाळ ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष अशोक फुटाणे, श्याम पंचभाई ,विनोद देशपांडे, कावळे, नागेश गांधी ,कुश राठोड, आनंद आडे सुधाकर बालबुधे, तसेच यवतमाळ ग्रंथालय महासंघाचे संजय कोल्हे, संजय पाटील, संदीप कदम, रामभाऊ सोनवणे, संदीप ढगे,विलास देशमुख, सह राजेश बदुकुले, महादेव गावंडे सर, हेमंत दांडेकर यांच्यासह ग्रंथालय कार्यकर्ते सह ग्रंथालय लिपिक अजय शिरसाठ, कांडलकर साहेब उपस्थित होते.