सेवानिवृत्त शिक्षकांचे व जि.प. कर्मचाऱ्याचे वेळेवर पेन्शन मिळत नसल्याने घेतली राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट!

पुसद: येथील जिल्हा परिषद सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना निवृत्ती वेतन वेळेत होत नसल्याने वृद्ध पेन्शनदार यांना उतार वयात कार्यालयाच्या पायऱ्या झिजवण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या सेवानिवृत्त शिक्षक व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची भेट घेऊन निवृत्तिवेतन वेळेत मिळावे अशी मागणी केली आहे.
पुसद येथील जि.प.यवतमाळ मधील सेवानिवृत्त शिक्षक व अधिकारी व कर्मचारी यांनी दि.१० जानेवारी २०२५ रोजी राज्याचे राज्यमंत्री मा.ना.इंद्रनिलभाऊ नाईक यांची भेट घेऊन मागिल पाच सहा महिन्यांपासून दरमहा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन नियमित एक तारखेला न होता दहा बारा दिवसानंतर होत असल्याने अनेक सेवानिवृत्तांना आपले कुटुंब चालवितांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.ऐन दिवाळीत सुद्धा सेवानिवृतांचे पेन्शन दिवाळीनंतर झाले.जि.प.यवतमाळ मधील सर्व शिक्षक, अधिकारी व सर्व कर्मचारी यांचे पेन्शन मधील अडचणी बाबत राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचेशी चर्चा करण्यात येईल व त्यांनी लगेच जि.प.यवतमाळचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना फोनवर बोलून व चर्चा करून पुढील महिन्यापासून सेवानिवृत्तांचे पेन्शन ऊशिरा होणार नाही याची ग्वाही दिली. याप्रसंगी हे निवेदन देण्यात आले.निवेदन देतांना सेवानिवृत्त शिक्षक विजय कडू (जिल्हा ध्यक्ष, मानवाधिकार परिषद यवतमाळ)विलास जाधव, प्रभाकर बोडखे, मोहन हिंगाडे, गणेश वाठोरे,करिमोद्दिन शरफोद्दीन,शे.सत्तार शे.गफूर, ज्ञानेश्वर इंगोले,शेख नजीर शेख कादीर,,जीवन मोरे,शैलेश डंबोळे, सुधाकर जाधव (मा.जिल्हाध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी संघटना) सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी सर्वश्री.एच.एम.मिर्झा,उत्तम चव्हाण,शेख अकबर शेख गफूर, सिद्धार्थ वाठोरे, मोहम्मद अकिल, रवींद्र आहळे, उमाकांत सोनटक्के व असंख्य सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते.