Uncategorizedराजकिय

आव्हाडांच्या कृतीचे राजकीय पडसाद: पुसद भाजपचे ‘जोडे मारो आंदोलन’ तर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी.?

पुसद:राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पोस्टर पाडल्याने अवमान केल्याचा आरोप भाजपने केलाय. भाजपने आव्हाडां विरोधात राज्यभर आंदोलनं करत आहे.त्याच अनुषंगाने पुसद शहरातही भाजपच्यावतीनं आज सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ.बाबासाहेब यांच्या पुर्णाकृती पूतळ्याला अभिवादन करून विधान परिषद सदस्य आमदार ॲड .निलयभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात आलं असून आव्हाडांविरोधात शहर पोलीस स्टेशन पुसद गाठुन भाजपाचे विश्वास भवरे यांनी सहकाऱ्यांसह तक्रार दाखल केली असून आव्हाडांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की,राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाड येथील चवदार तळ्याचा जागी मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. आव्हाड यांनी चवदार तळ्यावर पाणी पिऊन मनुस्मृतीचा निषेध केला. या मनुस्मृती दहन आंदोलनात त्यांच्याकडून अनावधाने मनुस्मृती पुस्तकावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटोही फाडण्यात आला. आपल्या हातून चुकून घडलेल्या या प्रकाराबाबत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तातडीने जाहीर माफी देखील मागून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी मागितलेल्या माफीवर भाजपचे समाधान न झाल्याने आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार भाजप नेत्यांनी केला. या घटनेच्या निषेधार्थ भाजपकडून आव्हाड यांना धारेधर धरले जात असून त्यांच

अनुषंगाने पुसद शहरातही भाजपच्या वतीनं आज सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात महामानव डॉ.बाबासाहेब यांच्या पुर्णाकृती पूतळ्याला अभिवादन करून विधान परिषद सदस्य आमदार ॲड. निलयभाऊ नाईक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आव्हाडांच्या प्रतिमेला ‘जोडे मारो आंदोलन’ करण्यात आलं असून आव्हाडांविरोधात शहर पोलीस स्टेशन पुसद येथे भाजपाचे विश्वास भवरे, गौरव गायकवाड, बाळासाहेब खंदारे, वैभव उबाळे,यांनी सहकाऱ्यांसह तक्रार दाखल केली असून आव्हाडांविरोधात ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या आंदोलनाच्या वेळी आमदार ॲड.निलयभाऊ नाईक भाजपाचे विनोद जिल्हेवार, दीपक परिहार, प्रतीक चव्हाण, विजू भेलके, नटवरलाल उंटवाल, रुपेश जाधव, गजानन हिंगमिरे, पंजाब भोयर,अदि ज्येष्ठ नेते, महिला नेते, विविध आघाड्यांचे प्रमुख, युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

जितेंद्र आव्हाड यांनी आधीच म्हटले होते मनुस्मृतीला मानणारे लोक आजही आहेत .”मनुस्मृती दहन केल्याने काही लोकांच्या भावना दुखावल्या जातील” ते लोक मात्र कोणते कारण शोधतील त्याचाच फायदा भाजपने घेतला असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. परंतु जितेंद्र आव्हाड यांना महाडमध्ये जाऊन मनुस्मृतीचं दहन करणं चांगलंच महागात पडलं असंच चित्र सध्या पहावयस मिळत आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close