ईतर

पुसद शहरात सार्वजनिक ठिकाणी उठसूठ कुठेही बॅनर, पोस्टर लावणाऱ्या पोस्टरबाजांना वेसण घालण्याची मागणी!

अनधिकृत बॅनर पोस्टर्स होर्डींग्ज लावून शहराचे विद्रूपकरण तात्काळ थांबवा

पुसद:शहरातील मुख्य रस्त्यांवर किंवा चौका चौकात विद्युत खांबावर, महावितरणच्या डीपीवर तसेच सार्वजनिक व खासगी जागांवर अनधिकृत बॅनर पोस्टर्स होर्डींग्ज, फ्लेक्स,बॅनरच्या माध्यमातून जाहिरात करून मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जाते. अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा अंमलात आणला तरीही या कायद्यात अंतर्गत मालमत्ता विद्रूप करणाऱ्यांना दंड व कारावासाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. परंतु नगर परिषद प्रशासनाकडून या कायद्याची अंमलबजावणी केली जात नसल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याने या कायद्याचीच अंमलबजावणी होत नसल्याने पोस्टरबाजी करून जाहिरात करणारे पोस्टरबाजाचे मनोबल वाढले आहे त्यामुळे सार्वजनिक व खासगी जागांचा प्रचारासाठी वापर करण्याची प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे सार्वजनिक स्थळांचे सौंदर्य व महत्त्व नष्ट होत चालले असून संबंधित नगर परिषद प्रशासनाने अशा प्रवृत्तींना तात्काळ वेसण घालावी अशी मागणी जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.

पुसद शहरातील मुख्य रस्त्यांवर किंवा चौका चौकात विद्युत खांबावर, महावितरणच्या डीपीवर तसेच सार्वजनिक व खासगी जागांवर उठसूठ कुठेहीअनधिकृत बॅनर पोस्टर्स होर्डींग्ज, फ्लेक्स,बॅनरच्या माध्यमातून जाहिरात करून मालमत्तांचे विद्रुपीकरण केले जात आहे.अशा प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायदा अंमलात आणला तरीही पोस्टरबाजी करून जाहिरात करण्याची दिवसेंदिवसे संख्या वाढत चालली आहे. अनधिकृत बॅनर्स पोस्टर होर्डिंग लावून शहराचे विद्रुपीकरण सुरू आहे.या अनधिकृत होर्डिंग लावून जाहिरात करणे फ्लेक्स बॅनर लावणे व शहराचे विद्रुपीकरण करणे कायद्यानुसार तीन महिने कारावासाची शिक्षा किंवा दोन हजार रुपये दंड अथवा एकाचवेळी दंड व शिक्षा तरतूद आहे.या कायद्यानुसार कोणत्याही स्वरूपाचे फ्लेक्स ,बॅनर, पोस्टर सार्वजनिक अथवा खासगी जागेवर लावावयाचे असेल तर त्यासाठी नगर परिषद प्रशासनाची अनुमती घेणे आवश्यक असते. परंतु शहरात या कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने शहरातील विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावर,माहवितरण डीपीवर चौकाचौकात, शासकीय व निमशासकीय कार्यालये, रस्ते, सार्वजनिक व खासगी भिंती यावर पोस्टर, बॅनर चिपकवून सर्रासपणे काही दुकानदार जाहिराती सुरू करून शहर विद्रूप करीत आहेत.या पोस्टरबाजीमुळे रस्त्याने वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना समोरुन येणाऱ्या वाहनाचा थांगपत्ता लागत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचे शहराच्या विद्रुपीकरणाकडे मात्र दुर्लक्ष आहे. विद्रुपीकरणाला आळा घालण्याची जबाबदारी नगरपरिषद प्रशासनाची आहे. परंतु ही जबाबदारी नगर परिषद प्रशासन पार पाडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशा अनधिकृत बॅनर पोस्टर्स होर्डींग्ज लावून शहर विद्रूप करणाऱ्या जाहिरात बाजावर कारवाई करण्याची मागणी जनतेतून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close