ईतर

पुसद बसस्थानकाच्या आवारातील यात्रा शेडमध्ये वयोवृद्ध इसमाचा बेवारस आढळला मृतदेह!

पुसद: येथील बसस्थानकाच्या आवारातील यात्रा शेडमध्ये परिसरात ७४ वर्षीय वयोवृद्ध पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. पोलिसांनी याची ओळख पटवली असून शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे. हबीब खान अजीज खान वय ७४ वर्षे रा.मंगरुळपीर जि.वाशीम असे मृत्यदेह आढळलेल्या वयोवृद्ध इसमाचे नाव आहे.याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुसद बसस्थानकांच्या आवारातील यात्रा शेडमध्ये आज दि.३ जुन २०२४ रोजी प्लॉटफार्म क्रं.४वर सकाळी १०:०० वाजण्याच्या सुमारास काही प्रवाशांना एक इसम झोपलेल्या स्थितीत आढळून आला आसता तो कोणतेही हालचाल करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.याची माहिती प्रवाशांनी आगारातील कर्मचाऱ्यांना देण्यात आली त्यानंतर आगारातील अधिकाऱ्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याला संपर्क साधून माहिती दिली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राहुल भगत व बद्रीनाथ लिंबुळे या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता त्याच्या खिशामधून त्याचे आधार कार्ड सापडले त्या आधार कार्डच्या आधारावर त्यांच्या नातेवाईकांना संपर्क केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली असुन त्याचा मृतदेह येथील उपजिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी दाखल केला असून नातेवाईक आल्यानंतरच शवविच्छेदन केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सदर इसम हा बस स्थानकामध्ये भिक मागून उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close