दराटी पो.स्टे.हद्दीतील अमडापुर येथे धारधार शस्त्र बागळणा-या इसमावर गुन्हा दाखल;स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई!

यवतमाळ : जिल्ह्यांत कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे सुरु राहणार नाही तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंथा सा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिस्थान पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.दि. १ मे२०२५रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुसद व उमरखेड उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना पोलीस स्टेशन दराटी हददीतील मौजे-अमडापुर ता. उमरखेड येथील इसम नामे-शेख समीर शेख कलीम यांचे ताब्यात लोखंडी तलवार असून सदरची तलवार तो त्याचे घरी ठेवलेली आहे तसेच तो सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था भंग करुन दुखलपात्र गुन्हा करण्याचे इरादयाने लोंखडी धारधार तलवार बाळगून आहे अशी मुखबीरव्दारे खात्रीशिर माहीती मिळाल्याने नमूद खालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी दोन पंचासह मौजे-अमडापूर ता.उमरखेड येथे जावून कौशल्यपुर्ण विचारपूस करुन पंचा समक्ष घरझडती घेतली असता त्याचे घरातून एक धारधार पाते असलेली लोखंडी तलवार किंमत रु २०००/- रु मिळून आल्याने ती जप्त करुन ताब्यात घेवून इसम नामे-शेख समीर शेख कलीम वय२२ वर्ष, रा. अमडापूर ता.उमरखेड जि. यवतमाळ यांच्या विरुध्द पोलीस स्टेशन दराटी अप क्रमांक ८४/२०२५ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा अन्चये गुन्हा करण्यात आलेला आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



