भोजला येथील धोकादायक दगडाच्या खदानी जवळील आदिवासी इंग्रजी आश्रम शाळेच्या बांधकामाला स्थगितीचे आदेश तरीही कंत्राटदाराकडून विभागीय आयुक्ताच्या आदेशाची पायमल्ली शाळेचे बांधकाम सुरूचं!

पुसद: तालुक्यातील भोजला ग्रामपंचायतीच्या हद्दीत आदिवासी इंग्रजी आश्रम शाळेचे बांधकाम आजही सुरू आहे. धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतीचे बांधकाम थांबण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद बशारत अली सय्यद कादर यांनी दि.१४ डिसेंबर २०२३ रोजी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्याने आहे त्या स्थितीमध्ये तात्काळ बांधकाम थांबविण्याचे आदेश दि.५ मार्च २०२४ रोजी देण्यात आले आहे.तरी देखील आजही ठेकेदाराकडून सदर शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरूच ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.येथील आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत चालविण्यात येत असलेल्या शासकीय इंग्रजी माध्यमाच्या आश्रम शाळा वडगाव (शिंदे) या शाळेचे प्रस्तावित बांधकाम शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर भोजला येथील ई-क्लास जमिनीवर गट क्रमांक २७२ या प्रस्तावित जागेवर करण्याचे आयोजन आहे.त्या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग व एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत केल्या जात आहे.परंतु सदर जमिनीला लागून खाजगी दगडी खदान असून भविष्यात या शाळेच्या इमारतीसाठी व येथील निवासी विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे.सदर प्रस्तावित बांधकाम त्या ठिकाणी न करता इतर कोणत्याही सुरक्षित ठिकाणी करण्यात यावे अशा आशियाची तक्रार येथील सामाजिक कार्यकर्त्याच्यावतीने पुसदच्या आदिवासी प्रकल्प कार्यालय तसेच आदिवासी विकास मंत्र्याकडे करण्यात आली होती.शाळेच्या इमारतीसाठी व आदिवासी मुला-मुलींची दोन वसतिगृहे, आदिवासी इंग्रजी माध्यमाच्या दोन शाळा,आदिवासी सांस्कृतिक भवन व आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या इमारत बांधकामासाठी वारंवार समाज बांधवांनी आंदोलन करून निवेदन दिले.या सर्व प्रकल्पांसाठी काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील सूतगिरणीची जागा उपलब्ध करून द्यावी,अशी मागणी केली होती.परंतु ती जागा उपलब्ध करून न देता शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेसाठी शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावरील धोकादायक जागा उपलब्ध करून देण्यात आली.त्यामुळे या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा वडगाव (शिंदे) या शाळेच्या इमारतीचे बांधकाम भोजला येथील गट क्रमांक २७२ या प्रस्तावित जागेवर करण्याचे आयोजन केले आहे.पंरतु सदर गट क्रमांकाला लागुन खाजगी दगडीखदान आहे.धोकादायक जागेवर असल्यामुळे तक्रारदाराने तक्रारी केल्या होत्या.त्या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जसे आहे,त्या स्थितीमध्ये तात्काळ बांधकाम थांबण्याचे आदेश पारित केले होते.
साईटच्या काठावर विहिरीसारखे भल्ले मोठे खड्डे
इंग्रजी माध्यमाची निवासी शाळा असल्याने या शाळेच्या इमारतीचे बांधकाम सदर प्रस्तावित जागेवर झाल्यास बाजूलाच दगडीखदान सुरू असल्यामुळे खाणकाम साईटच्या काठावर विहिरीसारखे भल्ले मोठे खड्डे पडून असून त्या खड्ड्यामध्ये पाणी साचत असते. आणि तेथे स्फोटकांच्या मदतीने, दगडाचे थर तोडले जातात,जे नंतर जेसीबी मशीनच्यासाह्याने डंपर ट्रकमध्ये लोड करुन वाहतूक केल्या जात आहे.
निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात………….. शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळा वडगाव (शिंदे) या शाळेच्या इमारतीचे बांधकाम भोजला येथील गट क्रमांक २७२ या प्रस्तावित जागेवर केल्यास सबंधित विभाग जाणीवपूर्वक या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घालत आहेत.त्यामुळे संबंधित प्रशासने प्रस्तावित जागेचा संपूर्ण विचार करून इतरत्र जागा शोधून आदिवासी विभागाने मास्टर प्लॅन तयार करुन सदर शाळेच्या इमारतीचे बांधकाम इतर कुठल्याही सुरशित जागेवर करावे शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे त्यामुळे संबंधित प्रशासने प्रस्तावित जागेचा संपूर्ण विचार करून इतरत्र जागा शोधून आदिवासी विभागाने मास्टर प्लॅन तयार करुन सदर शाळेच्या इमारतीचे बांधकाम इतर कुठल्याही सुरशित जागेवर करावे शासकीय इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे व मुलांचे व मुलींचे वसतीगृहाचे सर्व सुविधायुक्त दर्जेदार इमारतीचे काम करावे. अशा आशयाची तक्रार व निवेदन सामाजिक कार्यकर्तेच्यावतीने आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
बांधकाम थांबविण्याच्या सूचना पत्राद्वारे दिले..
भोजला येथील आदिवासी आश्रम शाळेच्या इमारतीच्या बांधकामाला स्थगिती आल्याने एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाला तात्काळ बांधकाम थांबण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.आदिवासी प्रकल्प कार्यालयाने लक्ष दिले पाहिजे.ते पाहण्याची जबाबदारी त्यांची आहे-महादेव जोरवर,तहसिलदार
इमारतीचे बांधकाम थांबलेले आहे
जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार तेथील आदिवासी शाळेचे बांधकाम तात्काळ थांबविण्यात आले आहे.इमारतीवर स्लॅब टाकल्यामुळे पाणी देण्याचे व स्लॅबवर पाणी अडविण्यासाठी कॅरी बनविण्यात येत आहे. स्लॅब टाकल्यामुळे क्युरींग करावी लागते.सध्या बांधकाम पूर्ण बंद असून ठेकेदाराला तसे कळविण्यात आले आहे.-आत्माराम धाबे,प्रकल्प अधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,पुसद