बाबासाहेब नाईक इंजीनियरिंग कॉलेजच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स विभागाच्या विद्यार्थ्यांची सायबर सिक्युरिटीच्या अद्यावत माहितीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बिजे यांची भेट

पुसद : बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुसद शहर पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी आपीएस मा.हर्षवर्धन बिजे यांना भेट देऊन ऑनलाईन फसवणुक व त्या अनुषंगाने विविध विषयाची माहिती दि.१७ नोव्हेंबर २०२५ सोमवार रोजी घेतली.बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.अविनाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत आर्टिफिशल इंटेलिजेंन्स अँड डेटा सायन्स या शाखेचे विभाग प्रमुख डॉ. अभय गायकवाड आणि प्रा.गोपाल आडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला.या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बाबासाहेब नाईक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कॉलेजचे आर्टिफिशल इंटेलिजंन्स अँड डेटा सायन्स विभागाच्या विद्यार्थी मनस्वी खांडेकर, तन्मय जाधव,वेदिका जामगे,श्रीपाद कुबडे, तनुश्री पाचखंडे,यांनी त्यांच्या प्रकल्पाचा भाग म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी आपीएस हर्षवर्धन बिजे यांची भेट घेतली या भेटीचा मुख्य उद्देश सायबर गुन्हे, डिजिटल सुरक्षा आणि तपास प्रक्रिया यांचे प्रत्यक्ष ज्ञान घेणे हा होता.सायबर कायदे आणि इंटरनेट सुरक्षित वापराण्याचे महत्व या माहितीमुल्य भेटीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रकल्पाला व्यावहारिक आणि विश्वसनीय माहितीची जोड मिळाली,सदर भेटीतील झालेल्या चर्चेमध्ये विद्यार्थ्यांच्या मनातील प्रश्नाची उकल झाली व सायबर सेक्युरिटीची अद्यावत माहिती मिळाली त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपीएस अधिकारी हर्षवर्धन बिजे साहेबांचे यावेळी मनातून धन्यवाद व्यक्त केले
सायबर फ्रॉडचे प्रमाण दिवसेन दिवस मोठ्या झपाट्याने वाढत आहे. आणि त्या बद्दलची माहिती प्रत्येकाला असायलाच पाहिजे तुम्ही याबद्दलची माहिती प्रोजेक्टच्या माध्यमातून लहान विद्यार्थ्यांना देत आहात पण प्रत्येक लहान विद्यार्थ्यान जवळ मोबाईल किंवा लॅपटॉप उपलब्ध असेलच असं नाही आहे.आणि त्यामुळे त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणार नाही. त्यामुळे महत्त्वाचे हे आहे की या लहान विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातच सायबर सिक्युरिटी बद्दल माहिती उपलब्ध करायला पाहिजे त्यांना अभ्यासक्रमात सायबर सेक्युरिटीचा एक विषय असणे आजच्या काळाची गरज आहे.
– हर्षवर्धन बिजे( आपीएस) उपविभागीय अधिकारी पुसद



