काँग्रेसने पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांचे उमेदवारी अर्ज मागवले!

पुसद : आगामी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने शहरातील संपूर्ण इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यास सुरवात केली आहे. स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी आमच्याशी कुणीही आघाडीसाठी विचारणा केली नाही. त्यामुळे आम्हीही तसा प्रस्ताव पाठविला नाही. जर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्ष स्वबळावर लढणार असतील तर काँग्रेस पक्ष सुद्धा या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्यास सज्ज असल्याची माहिती राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. मोहम्मद नदीम यांनी सांगितले आहे. त्यामुळे होऊ घातलेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी डॉ.मोहम्मद नदीम संपर्क कार्यालय (डी.एन. कॉम्प्लेक्स वाशिम रोड पुसद) येथे सकाळी ११:००ते५:०० वाजेपर्यंत पक्षाने आकारलेल्या फीसह दि. ३० ऑक्टोंबर २०२५ पर्यंतअर्ज संपूर्ण माहितीसह वरून अर्ज सादर करावे लागणार आहे. काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रसिद्धीपत्रकातून असे आवाहन शहराध्यक्ष झिया शेख यांनी केले आहे.अधिक माहिती करिता१) सय्यद इस्ती्यक – ९८८१७८६७६९. २) झिया शेख – ९०११९०८८११यांच्याशी सपंर्क साधावा..



